लग्न झालेल्या दिग्दर्शकासोबत अफेअर, नातं तुटताच गर्भपातासाठी मागितलेले 75 लाख, आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

अभिनेत्री राम्या कृष्णन यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्यांनी बॉलिवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्री दोन्हींकडे दर्जेदार चित्रपट केले आहेत. 90च्या दशकात राम्या एक लोकप्रिय अभिनेत्री होती. मात्र, बाहुबली चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. 

Mansi kshirsagar | Sep 15, 2024, 13:34 PM IST

Ramya Krishnan Birthday: अभिनेत्री राम्या कृष्णन यांचा आज 53 वा वाढदिवस आहे. त्यांनी बॉलिवूड आणि साउथ फिल्म इंडस्ट्री दोन्हींकडे दर्जेदार चित्रपट केले आहेत. 90च्या दशकात राम्या एक लोकप्रिय अभिनेत्री होती. मात्र, बाहुबली चित्रपटातून तिला खरी ओळख मिळाली. 

1/7

लग्न झालेल्या दिग्दर्शकासोबत अफेअर, नातं तुटताच गर्भपातासाठी मागितलेले 75 लाख, आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

Ramya Krishnan's alleged extra-marital affair with popular South Indian director

राम्या कृष्णनेने गोविंदा, अमिताभ बच्चन आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत काम करुन जास्त स्टारडम मिळाले नाही जे प्रभाससोबतच्या एका चित्रपटामुळं मिळालं. राम्याच्या प्रोफेशनल लाइफसोबतच तिच्या खासगी आयुष्यावरही चर्चा होत होत्या. राम्या हिचे एका दिग्दर्शकासोबत अफेअर होते. मात्र दिग्दर्शकाकडून गर्भपात करण्यासाठी लाखो रुपये मागितल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. 

2/7

Ramya Krishnan's alleged extra-marital affair with popular South Indian director

राम्या कृष्णनने बॉलिवूड आणि तामिळ-तेलगू चित्रपटसृष्टीतील मोठ्या कलाकारांसोबत काम केलं. त्यांचे करोडो फॅन आहेत. यामध्ये दिर्गदर्शक के एस रविकुमार यांचं नावही घेतलं जातं. दोघांमध्ये नंतर प्रेम फुललं मात्र त्यांचे वादही विकोपाला गेले. 

3/7

Ramya Krishnan's alleged extra-marital affair with popular South Indian director

दिग्दर्शक केएस रविकुमार यांचा 1999मध्ये आलेला चित्रपट पदयप्पा आणि पत्तलीमध्ये राम्याने काम केलं होतं. राम्याला या दोन्ही चित्रपटातून खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर रविकुमार यांचा 2002मध्ये आलेल्या पंचतंत्रमध्येही राम्याने काम केलं होतं.   

4/7

Ramya Krishnan's alleged extra-marital affair with popular South Indian director

या तीन वर्षांत राम्या आणि केएस रविकुमार यांच्यातील जवळीक वाढली. मात्र रविकुमार यांचे आधीच लग्न झाले होते. मात्र तरीही त्यांचे आणि राम्याचे नाते फुलले. नंतर राम्या गरोदरही असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.   

5/7

Ramya Krishnan's alleged extra-marital affair with popular South Indian director

जेव्हा केएस रविकुमार यांना याबाबत माहिती मिळाली तेव्हा त्यांनी राम्याला धमकी दिली. याचाच परिणाम रविकुमार यांच्या कुटुंबावर होऊ लागला होता.   

6/7

Ramya Krishnan's alleged extra-marital affair with popular South Indian director

रविकुमार यांचे पत्नीसोबतच संबंध बिघडत चालले होते. त्यामुळं वैतागून दिग्दर्शकाने राम्यासोबचे संबंध तोडून टाकले. रिपोर्टनुसार, तेव्हा राम्याने गर्भापात करण्यासाठी 75 लाख रुपयांची मागणी केली होती.

7/7

Ramya Krishnan's alleged extra-marital affair with popular South Indian director

राम्या आणि रविकुमार यांच्याबाबतच्या चर्चांना उधाण आल्यानंतर मात्र दोघांनीही हे खोटं असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर पुढच्याच वर्षी राम्याने 2003 साली फिल्ममेकर कृष्णा वामसीसोबत लग्न केले. राम्याला एक मुलगा देखील आहे त्याचे नाव रित्विक कृष्णा असं आहे.