PHOTO : 1971 मधील सुपरहिट चित्रपट; अभिनेत्याने मानधन न घेता, कमावले होते 10 पटीने जास्त पैसे

Entertainment : 1971 साली एक चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्याची चर्चा आजही होते. या चित्रपटाची स्टोरीपासून त्यातील संवादांपर्यंत सगळ्यांने चाहत्यांची मनं जिंकली होती. दोन सुपरस्टारच्या अभिनयामुळे तर चाहते प्रेमातच पडले होते. विशेष म्हणजे अभिनेताने या चित्रपटासाठी मानधन घेतलं नाही, तरीही 10 पट जास्त पैसेही कमावले होते.

नेहा चौधरी | Oct 08, 2024, 16:56 PM IST
1/7

सुमारे 53 वर्षांपूर्वी एक जबदस्त चित्रपट आला होता. आजही तो पाहिला जातो. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाल केली होती. आजही या चित्रपटाची जोरदार चर्चा होते. या चित्रपटाची खासियत म्हणजे अभिनेत्याने चित्रपटासाठी मानधन घेतलं नव्हतं. पण तरीही त्याने 10 पट पैसे कमावले होते. तो अभिनेता कोण होता आणि चित्रपट कुठला होता याचा अंदाज तुम्हाला आला का?

2/7

राजेश खन्ना यांना भारताचा पहिला सुपरस्टार अशी पदवी मिळाली होती. ते या जगात नसले तरी त्यांचा दमदार अभिनय आजही लोकांच्या हृदयात जिवंत आहेत. राजेश खन्ना यांनी 70 ते 80 च्या दशकात बॉलिवूडवर एकट्याने राज्य केलं होतं. त्यांचा एक मोठा चाहत्या वर्ग होता. 

3/7

राजेश खन्ना यांनी 15 बॅक टू बॅक हिट चित्रपट देण्याचा विक्रम केला होता. जो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. त्याच्या काळातील सर्वात महागडा सुपरस्टार म्हणून ते ओळखले जायचे. मात्र, 1971 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आनंद' चित्रपटासाठी त्यांनी कोणतेही मानधन घेतलं नव्हतं. विशेष म्हणजे हा निर्णय त्याच्यासाठी चांगलाच फायदेशीर ठरला होता. 

4/7

चित्रपट इतिहासकार दिलीप ठाकूर यांनी ETimes ला दिलेल्या मुलाखती सांगितलं की, राजेश खन्ना यांनी आनंद चित्रपटासाठी एक रुपयाही घेतला नव्हता. त्या बदल्यात, त्यांनी शक्तीराज फिल्म्स बॅनरखाली चित्रपटाच्या वितरण हक्कांची मागणी केली होती.

5/7

दिलीप ठाकूर म्हणाले, 'आनंदच्या वितरणातून राजेश खन्ना यांनी त्यांच्या फीपेक्षा 10 पट जास्त कमाई केली होती.' या चित्रपटात सुपरस्टारने आपल्या अभिनयाने लोकांची मनं जिंकली होती. प्रदर्शित झाल्यानंतर, हा चित्रपट कल्ट क्लासिक चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला होता. या चित्रपटात राजेश खन्नासोबत अमिताभ बच्चन देखील होते. 'आनंद' हा चित्रपट हृषिकेश मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली तयार झाला होता. 

6/7

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, 'आनंद'साठी राजेश खन्ना यांची पहिली पसंती नव्हती. हृषिकेश मुखर्जी यांनीही चित्रपटाची कथा धर्मेंद्र आणि किशोर कुमार यांना डोळ्यासमोर ठेवून केली होती. फ्लाइटमध्ये चेन्नईहून मुंबईला गेल्यानंतर त्यांनी धर्मेंद्रला आनंदची गोष्ट सांगितली होती. मात्र, त्यानंतर हृषिकेश मुखर्जीने दोन्ही स्टार्स सोडून राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन यांना कास्ट केलं. 

7/7

दिलीप ठाकूर यांनी सांगितले की, त्यावेळी सुपरस्टार असल्याने राजेश खन्ना यांचं शेड्युल खूप व्यस्त होतं. ते अनेक चित्रपटांमध्ये काम करत होते. हृषिकेश मुखर्जी यांनी त्यांना एकत्र तारखा देण्याची मागणी केली आणि राजेश खन्ना यांनी ते मान्य केलं. याचा परिणाम असा झाला की, 'आनंद'चे शूटिंग अवघ्या 28 दिवसांत पूर्ण झाली.