सायरा बानो आणि नूतन यांच्या प्रेमात वेडा होता 'हा' विवाहित अभिनेता ; 60 हजार रुपयांना विकत घेतला मुंबईत पछाडलेला बंगला

Rajendra Kumar Death Anniversary : सायरा बानो आणि नूतन या विवाहित अभिनेत्याचा प्रेमात वेड्या होत्या. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, या अभिनेत्याने त्या एका कारणामुळे नूतन यांच्यासोबत काम करणे थांबवले. तर पोलिसाची नोकरी सोडून त्याने अभिनयाच क्षेत्र निवडलं होतं. 

| Jul 12, 2024, 11:39 AM IST
1/11

'जीत', 'संगम', 'आरजू', 'सूरज', 'धूल का फूल' यासह अनेक चित्रपटांमध्ये आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात घर करणारा अभिनेता राजेंद्र कुमार. ते आज आपल्यामध्ये नाहीत. ज्युबली कुमार आणि कंजूस अभिनेता अशी त्यांची ओळख होती. 

2/11

राजेंद्र कुमार यांचा जन्म 20 जुलै 1927 ला सियालकोटमध्ये झाला. त्याचे वडील कपड्यांचा व्यवसाय करायचे तर आजोबा मिलिटरी कॉन्ट्रॅक्टर होते. एकंदरीत श्रीमंत घराण्यातील हा अभिनेत्याला फाळणीचा फटका बसला. फाळणीनंतर हे सर्वजण दिल्लीत आले. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटले की राजेंद्र कुमार यांना पोलीस व्हायचं होतं पण ते अभिनेता झाले. त्यानंतर ते मुंबईत आले तेही रिकाम्या खिशाने. त्यावेळी त्यांच्या या निर्णयामुळे वडिलांनी त्यांना फक्त एक घड्याळ सोबत दिली होती. ती घडाळ त्यांनी 63 रुपयांना विकली आणि 13 रुपयांचे तिकीट घेतलं आणि 50 रुपये खिशात ठेवले.

3/11

मुंबईत आल्यानंतर राजेंद्र कुमार गेस्ट हाऊसमध्ये राहत होते. तिथे कमी पैशात झोपायला खाट मिळायची. धर्मेंद्र आणि राज कुमार सारखे अभिनेतेही संघर्ष करत असताना या हॉटेलमध्ये थांबले होते. गंमत म्हणजे राजेंद्र कुमार या पलंगावर झोपल्याचे लोकांना सांगण्यात गेस्ट हाऊसचे लोक लोकांकडून जास्त पैसेदेखील घ्यायचे. 

4/11

अभिनयापूर्वी राजेंद्र कुमार यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यांनी 150 रुपयांना दिग्दर्शक एच.एस. रवैल यांच्यासह काम केलं. त्यानंतर त्यांनी 'पतंगा' चित्रपटात अभिनेत्याला छोटीशी भूमिका दिली. निर्माता देवेंद्र गोयल यांना 'वचन' (1955) या चित्रपटाद्वारे लॉन्च केलं. या चित्रपटासाठी त्यांना 1500 रुपये मानधन मिळाले होते. हा चित्रपट 25 आठवडे थिएटरमध्ये होता. 

5/11

राजेंद्र कुमार एकदा अख्खी रात्र रडत होते. कारण होत त्यांचा तो बंगला. ज्याला लोक हौंटेड म्हणतात. त्यांना पहिल्या नजरेत तो बंगला आवडला होता. पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. यांची बंगला घेण्याची इच्छा राज कपूरला कळली त्यांनी अभिनेत्याला अनेक चित्रपटात काम करण्याची संधी दिली. त्यानंतर राजेंद्र कुमार यांनी 60 हजारांमध्ये बंगला विकत घेतला.   

6/11

विवाहित असूनही राजेंद्र कुमारचे दोन अभिनेत्रींवर प्रेम होतं. एकाचं नाव सायरा बानो आणि दुसऱ्याचं नाव नूतन. अनेक चित्रपट एकत्र केल्यामुळे सायरा राजेंद्र कुमार प्रेमात पडले होते. मात्र अभिनेत्रीच्या घरच्यांचा या नात्यावर आक्षेप होता. त्यानंतर सायरा बानो यांनी दिलीप कुमारशी लग्न केलं. त्याच वेळी, अभिनेता नूतन यांचा हात मागण्यासाठी आई शोभना समर्थ यांच्याकडेही गेले होते. पण नूतन यांच्या आईने अभिनेत्याचा अपमान केला आणि नात्यालाही नकार दिला. त्यानंतर नूतन आणि राजेंद्र कुमार यांनी एकत्र काम करणे बंद केलं.

7/11

70 च्या दशकात राजेंद्र कुमार यांचे आकर्षण कमी होत होतं. त्यांचे अनेक चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे त्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत होता. त्यानंतर या शहरात राहण्यासाठी त्यांना आपला भाग्यवान बंगला विकावा लागला आणि तो राजेश खन्ना यांनी विकत घेतला. 

8/11

त्यानंतर राजेश खन्ना यांनी त्या घराला आशीर्वाद असं नाव दिलं. असं म्हणतात राजेश खन्ना आल्यानंतरच राजेंद्र कुमार यांचं करिअरला ब्रेक लागला. 

9/11

राजेंद्र कुमारचा विवाह शुक्ला कुमार, रमेश बहल आणि श्याम बहल यांच्या बहिणीशी झाला होता. त्यांना मुलगा कुमार गौरव आणि दोन मुली काजल आणि डिंपल होत्या. 

10/11

राजेंद्र कुमार यांचे 12 जुलै 1999 मध्ये मुलगा कुमार गौरवच्या वाढदिवसाच्या दिवशी निधन झालं. वाढदिवसाच्या दिवशी ते झोपले आणि दुसऱ्या दिवशी उठलेच नाही.  हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी जगाचा अखेरचा निरोप घेतला होता. असं म्हणतात शेवटच्या दिवसात त्यांची तब्येत खराब होती. वैतातून त्यांनी औषधं बंद केली होती. 

11/11

राजेंद्र कुमार यांचा संबंध सुनील दत्त यांच्याशी आहे. कारण गौरव कुमार याच लग्न संजय दत्त आणि प्रिया दत्त यांची लहान बहीण नम्रता दत्तसोबत झालंय.