Train Ticket Booking: गावी जाताना कन्फर्म तिकीट हवीय? मग ही सोपी ट्रिक वापरा

सध्या परीक्षांचा काळ सुरु असून त्यानंतर विद्यार्थ्यांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या पडणार आहेत. त्यामुळे अनेकांनी गावाकडे जाण्याचा प्लॅन आखला असेल. प्रवासासाठी सर्वात स्वतः पर्याय म्हणून रेल्वेकडे पाहिलं जातं. पण रेल्वेची कन्फर्म तिकीट नसल्याने अनेकांना गावी जाताना अनेकांचा हिरमोड होतो.  

Mar 10, 2023, 19:18 PM IST

जर तुम्ही गावी जाताना रेल्वेने जाण्याचा प्लॅन आखणार असाल आणि तुम्हाला कन्फर्म तिकीट हवं असेल तर आता काळजी करण्याचं कारण नाही. सोपी ट्रिक्स वापरुन तुम्हाला कन्फर्म तिकिटे सहज मिळू शकते. यासाठी तुम्हाला IRCTC मास्टर लिस्टद्वारे तिकीट बुकिंग करावं लागेल.

 

1/6

irctc master list

आयआरसीटीसीद्वारे प्रवाशांची मास्टर लिस्ट तयार करता येते. यामध्ये तुम्ही प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे नाव, वय आणि इतर तपशील असलेली एक मास्टर लिस्ट तयार करावी. यामुळे नंतर तिकीट बुक करताना तुमचा वेळ वाचतो

2/6

IRCTC profile

ही प्रवाशांची तपशीलवार माहिती असलेली लिस्ट तुम्ही IRCTC च्या प्रोफाइल सेक्शनमध्येही जाऊन तयार करू शकता.

3/6

 IRCTC

यासाठी सर्वात आधी तुम्हाला  IRCTC अ‍ॅप सुरु करावे लागेल. त्यानंतर माय अकाउंटचा ऑप्शन निवडून माय मास्टर लिस्टवर जा. (फोटो सौजन्य - Reuters)

4/6

IRCTC app

जर तुम्ही कोणतीही मास्टर लिस्ट तयार केली नसेल तर तुम्हाला रेकॉर्ड दिसणार नाही. तिथे OK वर क्लिक करा. यानंतर Add Passengers वर क्लिक करुन यामध्ये नाव, वय असे सर्व प्रवाशांची माहिती भरा आणि सेव्ह करा.

5/6

ticket booking

त्यानंतर तिकीट बुक करताना Plan My Journey वर क्लिक करा आणि प्रवासाचे स्टेशन आणि तारीख निवडा. हे झाल्यावर Go to Passenger Details वर जा आणि अॅड पॅसेंजर्स या पर्यायावर जा आणि मास्टर लिस्टमधून प्रवाशांचे तपशील भरा.

6/6

railway ticket

यानंतर पेमेंट करताच तुमचे तिकीट बुकिंग काही मिनिटांत होईल. या मास्टर लिस्टमुळे तुमचा तिकीट बुकिंगचा बराच वेळ वाचेल आणि तत्काळ कन्फर्म तिकीट मिळू शकेल.