Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकरी संकटात, पाहा कोणत्या जिल्ह्यात किती नुकसान झालं

Unseasonal Rain : राज्यातील शेतकऱ्यांवर (Farmers) अस्मानी संकट कोसळलं आहे. अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. तर गारपीटीने (Hailstorm) उभी पिकं आडवी झाली आहेत. त्यातच हाती आलेल्या पिकाला बाजारात कवडीमोल भाव मिळत असल्याने सांगा जगायचं कसं असा प्रश्न विचारायची वेळ बळीराजावर आलीय. कांदा, गहु, भाजीपाला, आंबा, काजू फळांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी (CM Eknath Shinde) जिल्ह्याधिकाऱ्यांना दिलेत. पण राज्यातील विविध जिल्ह्यात शेकडो हेक्टर जमिनीवरील पिकाचं नुकसान झालं आहे.

Mar 10, 2023, 18:31 PM IST
1/7

पालघर-760 हेक्टर नुकसान

राज्यात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला आहे. पालघरमध्ये तब्बल 760 हेक्टरवरील फळबागांचं नुकसान झालं आहे. आंबा, काजूच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. 

2/7

नाशिक- 2685 हेक्टर नुकसान

अवकाळी पावसाचा सर्वाधक फटका नाशिक जिल्ह्याला बसला आहे. अवकाळी पावसाने उभी पिकं आडवी झाली आहेत. गहू, भाजीपाला हातचा गेलाय तर द्राक्ष उत्पादकांनाही मोठा फटका बसलाय

3/7

धुळे- 3144 हेक्टर नुकसान

धुळ्यात तब्बल 3144 हेक्टरवरील शेतीला अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यातच गारपीट झाल्याने उरलंसुरलेलंल पीकही मातीमोल झालंय. 

4/7

नंदूरबार-1576 हेक्टर नुकसान

नंदूरबारमधल्या शहादा, अक्कलकुवा, तळोदा या भागात अवकाळी पावसाने हाहाकार उडवला आहे. मका, हरभरा पीक पाण्यात गेलंय, तर केळी, पपई, आंबा फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. 

5/7

जळगाव-214 हेक्टर नुकसान

जळगावमध्येही भुसावळ धरणगाव इथं अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक गेल्याने शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतोय.

6/7

अहमदनगर-4100 हेक्टर नुकसान

अवकाळी पावसाने अहमदनगर जिल्ह्यात तब्बल चार हजाराहून अधिक हेक्टरवरील शेतीचं नुकसान झालं आहे. राहुली, नेवासा, अकोले, कोपरगाव या भागात शेतपिकं मातीमोल झालीत.

7/7

बुलढाणा-775 हेक्टर नुकसान

राज्यातील अनेक भागातअवकाळी पावसानं दाणादाण उडवली आहे. अवकाळी संकटामुळे राज्यात शेतकऱ्यांचा बेरंग झाला आहे. शेतकरी राजा हतबल झालाय. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेयत. पंचनामे सुरुही होतील, पण सध्या गरज आहे ती शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदतीची.