रेल्वेकडून कोकणवासियांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट, 6 विशेष गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात
कोकण आणि गणेशोत्सव हे वेगळं नातं आहे. कितीही कामे असली तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी गावी जातोच. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप असते. आधीच आरक्षण फूल झाल्याने अनेक चाकरमान्यांना आतापर्यंत तिकिट काढता आले नाही. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे.
Special Trains For Ganeshotsav:कोकण आणि गणेशोत्सव हे वेगळं नातं आहे. कितीही कामे असली तरी कोकणी माणूस गणेशोत्सवासाठी गावी जातोच. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या खूप असते. आधीच आरक्षण फूल झाल्याने अनेक चाकरमान्यांना आतापर्यंत तिकिट काढता आले नाही. त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे.
1/8
रेल्वेकडून कोकणवासियांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट, 6 विशेष गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात
2/8
6 विशेष गाड्या
3/8
मुंबई सेंट्रल-ठोकूर दरम्यान 6 फेऱ्या
मुंबई सेंट्रल-ठोकूर दरम्यान 6 फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. 3, 10 आणि 17 सप्टेंबर रोजी विशेष गाडी मुंबई सेंट्रल स्थानकावरून दुपारी 12 वाजता सुटेल असून दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजून 50 मिनिटांनी ठोकूर येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी बुधवारी 4, 11 आणि 18 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता ठोकूर येथून निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7.05 वाजता मुंबई सेंट्रल येथे पोहोचणार आहे.
4/8
मुंबई सेंट्रल-सावंतवाडी दरम्यान 26 फेऱ्या
मुंबई सेंट्रल-सावंतवाडी रोड येथे विशेष गाडीच्या 26 फेऱ्या चालवल्या जाणार आहेत. 2 ते 16 सप्टेंबर या कालावधीत दररोज दुपारी 12 वाजता ही गाडी मुंबई सेंट्रलवरून सुटणार असून दुसऱ्या दिवशी पहाटे अडीच वाजता सावंतवाडीला पोहोचेल. दररोज पहाटे 4.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.10 वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचणार आहे. जाताना ही गाडी मंगळवारी धावणार नाही तर परतीच्या प्रवासात ही गाडी बुधवारी धावणार नाही, याची प्रवाशांनी नोंद घ्या.
5/8
वांद्रे-कुडाळदरम्यान 6 फेऱ्या
6/8
अहमदाबाद-कुडाळ दरम्यान 6 विशेष गाड्या
पश्चिम रेल्वेकडून अहमदाबाद-कुडाळ दरम्यान 6 विशेष गाड्या चालवल्या जाणार आहेत.ही विशेष गाडी अहमदाबाद येथून मंगळवार, 3, 10, 17 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी कुडाळ येथून बुधवार, 4, 11, 18 सप्टेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता सुटेल आणि रात्री 11.45 वाजता अहमदाबाद येथे पोहोचणार आहे.
7/8
विश्वामित्री-कुडाळदरम्यान 6 फेऱ्या
8/8