PHOTO : 400 फूट उंच 34व्या मजल्यावर बांधला आलिशान महाल! 'या' घरासमोर मुकेश अंबानींच्या अँटिलिया पण फिकं

जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादी म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर मुकेश अंबानी, रतन टाटा आणि गौतम अदानी हे डोळा समोर येतात. मुंबईतील मुकेश अंबानी यांचं अँटिलिया या घरासमोर 400 फूट उंच 34व्या मजल्यावर आलिशान महाल बांधण्यात आलंय.

| Dec 18, 2024, 21:14 PM IST
1/7

उद्योगपती मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे घर सर्वात महागडे असल्याचं बोलं जातं. मात्र, एक असाही महाल, जो पाहून तुम्हीही आश्चर्यचकीत तर व्हाल शिवाय तो कोणाचा आहे हे नाव वाचून तुम्हाला धक्का बसेल.

2/7

हा आलिशान महाल जमिनीपासून 400 फूट उंचीवर 34 व्या मजल्यावर साकारण्यात आलंय. व्हाईट हाऊससारखा दिसणारा हा महाल दोन मजली असा भव्य दिव्य दिमाखात आकाशाला गवसणी घालताना दिसतो. 

3/7

हा महाल कोणाचा आहे, तुम्हाला माहितीये का? डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, हा महाल विजय मल्ला यांचा आहे. या मल्ल्या मॅन्शनची किंमत सुमारे 20 मिलियन डॉलर भारतीय चलनानुसार सुमारे 170 कोटींचा घरात आहे. 

4/7

हा आलिशान महाल बेंगळुरूमधील यूबी सिटीमध्ये असलेल्या किंगफिशर टॉवरच्या वर बांधण्यात आलाय. हा बंगला एका बहुमजली इमारतीच्या वरच्या कँटीलिव्हर स्लॅबवर असून 4.5 एकरमध्ये पसरलेलाय. विशेष म्हणजे हा बंगला जमिनीपासून 400  फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. 

5/7

या आलिशान हवेलीमध्ये वाईन सेलर, इनडोअर हॉट पूल आणि आउटडोअर इन्फिनिटी पूल आहे. हेलिकॉप्टर उतरण्यासाठी छतावरच हेलिपॅड आहे. याशिवाय या बंगल्याभोवती फिरण्यासाठी स्काय डेक सारखी सुविधा आहे, जिथून संपूर्ण बेंगळुरू शहराचं मनमोहक दृष्य पाहिला मिळतं.

6/7

विशेष म्हणजे विजय मल्ल्या यांनी हा बंगला मोठ्या थाटात बांधला खरा पण भारतातून पळून गेल्यामुळे तो या महालाचे सुखद अनुभव घेता आला नाही. बेंगळुरूमध्ये बांधलेला किंगफिशर टॉवर युनायटेड ब्रेवरीज होल्डिंग्स लिमिटेड (विजय मल्ल्याची कंपनी) आणि प्रेस्टिज ग्रुपचा जॉइंट व्हेंचरचा आहे. 

7/7

या टॉवरमधील एका फ्लॅटची किंमत 50 कोटींहून अधिक आहे. या सोसायटीत अनेक अब्जाधीश उद्योगपती राहतात, ज्यात इन्फोसिसचे नारायण मूर्ती, सुधा मूर्ती, झिरोधाचे निखिल कामत आणि बायोकॉनचे किरण मुझुमदार शॉ आणि इतर सेलिब्रिटी आहेत.