'पुष्पा 2' चित्रपट 1500 कोटींची कमाई करूनही 'या' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाही

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ सुरु आहे. या चित्रपटाने 15 व्या दिवशी 1500 कोटींचा आकडा पार केला आहे. तरी देखील हा 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये. 

Soneshwar Patil | Dec 20, 2024, 12:57 PM IST
1/7

अल्लू अर्जुन

अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2' चित्रपटाचा 15 दिवसांनंतरही बॉक्स ऑफिसवर  दबदबा काय आहे. अल्लू अर्जुनच्या या चित्रपटाने अजून एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे. 

2/7

अनेक रेकॉर्ड

'पुष्पा 2' चित्रपटाने 15 व्या दिवशी 1500 कोटींचा टप्पा पार केलाय. या चित्रपटाने पहिल्या दिवसापासूनच अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. 

3/7

नवीन रेकॉर्ड

दररोज कोटींमध्ये कमाई करून हा चित्रपट नवीन रेकॉर्ड तयार करत आहे. दरम्यान, चित्रपटाचे 14 दिवसांचे वर्ल्डवाइड कलेक्शन समोर आले आहे. 

4/7

वर्ल्डवाइड कलेक्शन

चित्रपटाच्या प्रोडक्शन हाउस माइथ्री मूवी मेकर्सने नुकतेच चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन शेअर केले आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने जगभरात 1508 कोटींची कमाई केलीय. 

5/7

पहिला भारतीय चित्रपट

कमी दिवसांमध्ये सर्वात जास्त कमाई करणारा 'पुष्पा 2' चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने 1500 कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री केली आहे. सर्वात जलद कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. 

6/7

बाहुबली 2

मात्र, 'पुष्पा 2' चित्रपट 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बाहुबली 2' चित्रपटाचा रेकॉर्ड मोडू शकला नाहीये. प्रभासच्या या चित्रपटाने जगभरात 1788.06 कोटींची कमाई केली होती. 

7/7

रश्मिका मंदाना

अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि अल्लू अर्जुन हे मुख्य भूमिकेत आहेत.