Pune News: खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू; पुणेकरांना सतर्कतेचा इशारा!

Pune News, Khadakwasla Dam: पुण्यातील खडकवासला धरण 92 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालीय. धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 वेगानं विसर्ग सुरू आहे. 

Jul 25, 2023, 20:17 PM IST

Pune Rain Update: गेल्या आठवड्यात पुणे शहरात (Pune News) पावसाची रिमझिम सुरू असल्याचं दिसत होतं. तर मावळात देखील पावसाचा जोर वाढला होता. अशातच आता पुण्यात पावसाने (Pune Rains) चांगली हजेरी लावली असल्याने धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता पुण्यातून मोठी माहिती समोर आली आहे.

1/5

खडकवासला धरण 92 टक्के भरलं

पुण्यातील खडकवासला धरण 92 टक्के भरलं असून या धरणातून पाणी सोडायला सुरुवात झालीय. धरणाचं एक गेट उघडण्यात आलं असून 428 वेगानं विसर्ग सुरू आहे. 

2/5

428 क्युसेक वेगाने पाणी विसर्ग

खडकवासला धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने मंगळवारी सायंकाळी 7 वाजल्यापासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात  428 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे.

3/5

पुण्याच्या पाण्याची चिंता

खडकवासला धरणातून पाणी सोडण्यात येत असलं तरी पुण्याच्या पाण्याची चिंता मिटली असं निश्चितच म्हणता येणार नाही. खडकवासला धरण साखळीतील मोठी धरणं जेमतेम 60 ते 65 टक्के इतकीच भरली आहेत.

4/5

धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतिक्षा

त्यामुळे पाणी सोडलं जातं असल्याचं दृश्य सुखावणारं असलं तरी धरणक्षेत्रात दमदार पावसाची प्रतिक्षा कायम आहे.

5/5

नदीपात्रात उतरू नये

नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात वाहनं, जनावरं असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत. सखल भागातील संबंधित नागरीकांनी सतर्क राहावं, असंही जलसंपदा विभागाने कळविलं आहे.