IPL 2023: 'मी कॉमेंट्री करत होतो, इतक्यात मला फोन आला...', केदार जाधवने सांगितला संपूर्ण किस्सा!

kedar jadhav ipl 2023: आरसीबीच्या (RCB) संघात समावेश कसा झाला, याचा किस्सा केदार जाधवने (kedar jadhav) सांगितला आहे. 

| May 05, 2023, 00:14 AM IST

Kedar Jadhav IPL 2023: आयपीएल 2023 च्या सुरुवातीपासून सर्वच संघाना दुखापतीचं ग्रहण लागलंय. आरसीबीचा (RCB) स्टार ऑलराऊडर डेव्हिड विली (david willey) दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडलाय. त्याच्या जागेवर केदार जाधव (Kedar Jadhav) याची निवड करण्यात आली आहे. त्याचा किस्सा केदारने मुलाखतीमध्ये सांगितला.

1/5

डेव्हिड विली जखमी असल्याने विराट कोहलीचं टेन्शन वाढलं होतं. यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) जखमी डेव्हिड विलीच्या जागी केदार जाधवला त्यांच्या संघाचा भाग बनवण्याची घोषणा केली.

2/5

आरसीबीने केदार जाधवला 1 कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये टीममध्ये सामील केलं आहे. केदार जाधव गेल्या मोसमात देखील खेळला नव्हता. मात्र, त्याची आता थेट आरसीबीच्या संघात एन्ट्री झालीये.

3/5

आरसीबीच्या संघात समावेश कसा झाला, याचा किस्सा त्याने सांगितला आहे. मी कॉमेंट्री करत होतो, त्याचवेळी मला संजय बांगर यांचा फोन आला, बांगर यांनी माझ्या फिटनेसबद्दल विचारलं.

4/5

मी आठवड्यातून दोनदा सरावाला जातो. तसेच मी रोज जिमला जातो, असं मी त्यांना उत्तर दिलं. त्यावेळी मला समजलं की, मला आरसीबीकडून खेळायला सांगणार आहेत. त्यानंतर माझं सिलेक्शन झालं, असं केदार जाधवने सांगितलं.

5/5

दरम्यान, 2010 च्या हंगामात केदार जाधव याने आयपीएलमध्ये पदार्पण केलं होतं. मात्र, यंदाच्या हंगामात कोणत्याही संघाने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. यानंतर तो जिओ सिनेमासाठी मराठी भाषेत कॉमेंट्री करत होता करत होता.