45 कोटी बजेट अन् कमाई 70 हजार, बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध अभिनेत्याने दिला सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट!

बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. परंतु, एका अभिनेत्याच्या चित्रपटाचे बजेट 45 कोटी होते. या चित्रपटाने फक्त 70 हजार रुपयांची कमाई केली होती. 

| Jan 05, 2025, 15:34 PM IST
1/7

बॉलिवूड अभिनेता

अनेक बॉलिवूड अभिनेत्यांनी त्यांच्या करिअरमध्ये हिट चित्रपट दिले आहेत. मात्र, एक असा अभिनेता आहे, ज्याच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 70 हजार रुपयांची कमाई केली. 

2/7

अर्जुन कपूर

या अभिनेत्याचे नाव अर्जुन कपूर आहे. 2012 मध्ये अर्जुन कपूरचा पहिला चित्रपट 'इशकजादे' प्रदर्शित झाला होता. 

3/7

हिट चित्रपट

अर्जुन कपूरने जरी त्याच्या करिअरची सुरुवात हिट चित्रपटाने केली असली तरी नंतर त्याचे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. 

4/7

द लेडी किलर

2023 मध्ये अभिनेत्याचा 'द लेडी किलर' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड फ्लॉप झाला होता. 

5/7

45 कोटी बजेट

'द लेडी किलर' या चित्रपटाची संपूर्ण भारतात फक्त 500 तिकिटे विकली गेली होती. या चित्रपटाचे बजेट 45 कोटी रुपये इतके होते. 

6/7

फ्लॉप चित्रपट

हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फक्त 70 हजार रुपयांची कमाई केली होती. अभिनेत्याचा हा सर्वात मोठा फ्लॉप चित्रपट आहे. 

7/7

आगामी चित्रपट

अल्लू अर्जुन 'मेरे हसबैंड की बीवी है' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 21 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.