रानबाजार सिरीजमधली 'ही' अभिनेत्री चांगलीच भडकली, कोण अफवा पसरवतंय?

Prajakta Mali: छोट्या पडद्यासह मोठा पडदा गाजवणारी लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी कायम सोशल मीडियावर चर्चेत असते.  'रानबाझार' या वेब सीरीजमध्येही अत्यंत बोल्ड भूमिकेत दिसली.   

Feb 27, 2023, 13:52 PM IST

Prajakta Mali: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक. प्राजक्ता माळीची रानबाजार (RaanBaazaar ) ही सिरीज (Web Series) खूप चर्चेत राहिली. या सिरीजमुळे तिला अडचणीचा सामना देखील करावा लागला होता. त्याला कारण होतं तिचा बोल्ड लूक (Bold Look) आणि एक अफवा... (Prajakta Mali talks about eat gutkha worse rumor in her life after raanbaazaar Web Series)

1/5

Prajakta Mali

प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय. गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता चर्चेत आहे. त्याला कारण तिचं लग्न (prajakta mali marriage). गेल्या काही दिवसांपासून प्राजक्ता माळीच्या लग्नाबद्दलची चर्चा सुरु आहे.

2/5

Prajakta Mali:

Prajakta Mali

जुळून येती रेशीमगाठी, नकटीच्या लग्नाला यायचं हं यांसारख्या प्रसिद्ध मालिकेतून प्राजक्ता घराघरात पोहोचली. मात्र रानबाजार (prajakta mali in ranbazar) ही सिरीज तिच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली. प्राजक्ताने या सिरीजमध्ये रत्नाची भूमिका साकारली होती. 

3/5

Prajakta Mali Bold Photos

तिच्या बोल्ड लूकमुळे (Prajakta Mali Bold Look) तिला टीकेचा सामना करावा लागलाच होता. त्याचबरोबर एक अफवा देखील त्यावेळी पसरली होती. त्यामुळे तिला आजही अडचणीचा सामना करावा लागतोय. नुकत्याच एका मुलाखतीत तिने यावर भाष्य केलंय.

4/5

Prajakta Mali Bold Photos

प्राजक्ता माळी गुटखा खाते, अशी अफवा सर्वदूर पसरली. काही बातम्या देखील त्याच्या समोर आल्या होत्या. त्यामुळे तिला आजही यावर प्रश्न विचारले जातात. वेब सिरीजमध्ये (prajakta mali Web series) दाखवण्यात आलेला गुटखा नसून ती बडीशेप होती, असं प्राजक्ताने सांगितलं.

5/5

Prajakta Mali Bold Photos

दरम्यान, यावर स्पष्टीकरण मिळावं म्हणून काहीजणांनी मला मॅसेज केले, असं ती सांगते. आता मी काय करू यांचं? यांच्यावर पोलीस केस करू का? असं म्हणत तिने संताप  (prajakta mali Angry) व्यक्त केला आहे.