Pragyan Rover Update: स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी रोव्हरने चंद्रावर काय शोधलं? जाणून घ्या
Pragyan Rover: स्लीपिंग मोडवर जाण्यापूर्वी आपल्या चांद्रयान-3 ने अनेक महत्त्वाची आणि विशेष माहिती पाठवली आहे. ज्यामध्ये चांद्रयान-३ च्या विक्रम लँडरमध्ये बसवण्यात आलेल्या शुद्ध पेलोडने चंद्राच्या तापमानाशी संबंधित पहिले निरीक्षण पाठवले.
Pragyan Rover: विक्रमने ज्या कामासाठी त्याला चंद्रावर पाठवले होते ते काम आता पूर्ण केले आहे. आता तो त्याच चंद्राच्या कुशीत आरामात झोपला आहे. खुद्द इस्रोने याबद्दल माहिती दिली. प्रज्ञान रोव्हरने आपले काम पूर्ण केले आहे. ते आता सुरक्षितपणे पार्क केले आहे आणि स्लीप मोडवर असल्याचे इस्रोने मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर लिहिले आहे.
1/9
Pragyan Rover Update: स्लीप मोडमध्ये जाण्यापूर्वी रोव्हरने चंद्रावर काय शोधलं? जाणून घ्या
2/9
22 सप्टेंबरला पुन्हा सक्रीय
3/9
रोव्हरची मोहीम फत्ते
4/9
रोव्हर स्लीपिंग मोडवर
विक्रमने ज्या कामासाठी त्याला चंद्रावर पाठवले होते ते काम आता पूर्ण केले आहे. आता तो त्याच चंद्राच्या कुशीत आरामात झोपला आहे. खुद्द इस्रोने याबद्दल माहिती दिली. प्रज्ञान रोव्हरने आपले काम पूर्ण केले आहे. ते आता सुरक्षितपणे पार्क केले आहे आणि स्लीप मोडवर असल्याचे इस्रोने मायक्रो ब्लॉगिंग साइट X वर लिहिले आहे.
5/9
पेलोड्समधील डेटा लँडरद्वारे पृथ्वीवर
APXS आणि LIBS या पेलोड्समधील डेटा लँडरद्वारे पृथ्वीवर पाठवण्यात आला आहे. आता त्याची बॅटरीही पूर्ण चार्ज झाली आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी चंद्रावर पुढील सूर्योदय होईल तेव्हा सूर्यप्रकाश सौर पॅनल्सवर पडेल, अशा दिशेला रोव्हर ठेवण्यात आला आहे. त्याचा रिसीव्हरही चालू आहे. त्यामुळे 22 सप्टेंबरपासून ते पुन्हा कामाला लागण्याची शक्यता आहे.
6/9
रोव्हरने चंद्रावर काय केले?
7/9
खड्डा पाहून मार्ग बदलला
यानंतर प्रज्ञान रोव्हरनेही 4 मीटरचा खड्डा पाहून मार्ग बदलला आणि महत्त्वाची माहिती पाठवली. ज्यामध्ये रोव्हरने चंद्रावर सल्फरच्या उपस्थितीची पुष्टी केली. ज्यामध्ये अपेक्षेप्रमाणे अॅल्युमिनियम, कॅल्शियम, लोह, क्रोमियम, टायटॅनियम, मॅंगनीज, सिलिकॉन आणि ऑक्सिजन अपेक्षित आहे. याची अधिक तपशीलवार माहिती येण्याची शक्यता आहे. यानंतरही रोव्हर पुढे जात राहिला आणि त्याने चंद्राच्या पृष्ठभागावर भूकंपांची नोंद केली.
8/9
100 मीटरचा प्रवास
9/9