Aditya L1 Launch : चंद्रामागोमाग सूर्यावरही इस्रोची नजर; Photo सह पाहा नव्या मोहिमेची तयारी कुठवर आली...

Aditya L1 Launch : ISRO नं एक मोठी मोहिम हाती घेतली असून, त्यासाठीची तयारी कुठवर आली आहे हे सांगणारे काही फोटोही शेअर केले.   

Aug 14, 2023, 15:11 PM IST

Aditya L1 Launch : ISRO च्या चांद्रयान 3 (chandrayaan 3) नं अवकाशाच्या दिशेनं झेप घेतली आणि पाहता पाहता हे चांद्रयान आता चंद्राच्या आणखी नजीक पोहोचलं आहे. संपूर्ण देशाची या मोहिमेवर नजर असून, आता इस्रो आणखी एक उडी घेण्याच्या तयारीत आहे. 

1/7

चांद्रयान 3

post chandrayaan 3 isro launches Aditya L1 Mission Update and photos

Aditya L1 Launch : चांद्रयान 3 नं नुकतीच चंद्राची आणखी एक कक्षा ओलांडली असून, हे यान आता चंद्राच्या आणखी जवळ पोहोचलं आहे. इथून पुढं चांद्रयान चंद्राच्या कक्षेत वर्तुळाकारात परिक्रमण करताना दिसणार आहे. 

2/7

महत्त्वाच्या मोहिमेत पुढाकार

post chandrayaan 3 isro launches Aditya L1 Mission Update and photos

एकिकडे चांद्रयान चंद्रावर पोहोचत नाही, तोच इथं इस्रो आणखी एका महत्त्वाच्या मोहिमेत पुढाकार घेताना दिसत आहे. त्यासंबंधीची माहिती नुकतीच इस्रोनं X वर ट्विट करत दिली आहे. 

3/7

श्रीहरीकोटा येथून प्रक्षेपण

post chandrayaan 3 isro launches Aditya L1 Mission Update and photos

Aditya L1 Solar Mission असं या मोहिमेचं नाव असून, त्यासाठी एक उपग्रह तयार करण्यात आली आहे. हा उपग्रह यू.आर.राव सॅटलाइट सेंटर (URSC) बंगळुरू येथे ठेवण्यात आला होता. ज्यानंतर आता तो प्रक्षेपणासाठी श्रीहरीकोटा येथील SDSC-SHAR येथे आणण्यात आला आहे. 

4/7

उपकरणांची चाचणी पूर्ण

post chandrayaan 3 isro launches Aditya L1 Mission Update and photos

इस्रोच्या या सौरमोहिमेतून सूर्यावर नजर ठेवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व उपग्रहांची आणि त्याच्यात लागणाऱ्या उपकरणांची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. Aditya L1 मध्ये  VELC, सूट, ASPEX, पापा, सोलेक्स, हेल10एस  आणि मॅग्नेटोमीटर अशी 7 उपकरणं असणार आहेत. हा उपग्रह एलएमवी एम-3 रॉकेटनं प्रक्षेपित केला जाणाप आहे. 

5/7

कुठे असेल हा उपग्रह ?

post chandrayaan 3 isro launches Aditya L1 Mission Update and photos

अंडाकृती कक्षेत पुढे जाणाऱ्या या उपग्रहाला सूर्य दृष्टीरक्षेपात आहे अशा 15 लाख किलोमीटर इतक्या अंतरावर  L-1 जवळ असणाऱ्या होलो ऑर्बिटमध्ये ठेवण्यात येणार आहे.

6/7

युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेची मदत

post chandrayaan 3 isro launches Aditya L1 Mission Update and photos

इस्रोच्या या मोहिमेमध्ये युरोपीय अंतराळ संशोधन संस्था ESA ची मोठी मदत होत असून, ती आदित्य एल1 च्या मार्गावर नजर ठेवणार आहे. याशिवाय या मोहिमेमध्ये गोनहिली आणि कॅरो ट्रॅकिंग अशा प्रक्रियाही असणार आहेत. 

7/7

आकाशगंगाविषयीची मोठी माहिती

post chandrayaan 3 isro launches Aditya L1 Mission Update and photos

या मोहिमेमुळं अवकाशातील इतरही आकाशगंगाविषयीची मोठी माहिती समोर येणार आहे. त्यामुळं चांद्रयान 3 प्रमाणंच आदित्य एल1 ही मोहिमही भारतासाठी तितकीच महत्त्वाची ठरत आहे. (सर्व छायाचित्र - इस्रो)