'राम' नामाच्या गजरानं अयोध्यानगरी दुमदुमली

Aug 05, 2020, 13:06 PM IST
1/7

'राम' नामाच्या गजरानं अयोध्यानगरी दुमदुमली

ayodhya अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांच्या मंदिर उभारणीच्या पायाभरणीचा दिवस उजाडला आणि साऱ्या भारत देशामध्ये मंगलमय वलातावरण पाहायला मिळालं.   

2/7

'राम' नामाच्या गजरानं अयोध्यानगरी दुमदुमली

अयोध्यानगरीमध्ये तर, गेल्या काही दिवसांपासून कमालीचा आनंद पाहायला मिळत आहे. हा आनंद शिगेला पोहोचला जेव्हा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिपूजनासाठी हजेरी लावत एक नवा शुभारंभ केला.   

3/7

'राम' नामाच्या गजरानं अयोध्यानगरी दुमदुमली

सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदीबेन पटेल, उत्तप प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर १७५ आमंत्रितांची या सोहळ्याला उपस्थिती पाहायला मिळाली.   

4/7

'राम' नामाच्या गजरानं अयोध्यानगरी दुमदुमली

यावेळी भूमिपूजन सोहळ्याची सुरुवात होण्यापूर्वी पंतप्रधानांनी शुभसूचक अशा पारिजातकाच्या रोपाचं वृक्षारोपणही केलं. 

5/7

'राम' नामाच्या गजरानं अयोध्यानगरी दुमदुमली

मंत्रोच्चारांच्या पवित्र स्वरांमध्ये या सुवर्ण क्षणाचं साक्षीदार साऱ्या देशाला होता आलं.   

6/7

'राम' नामाच्या गजरानं अयोध्यानगरी दुमदुमली

अतिशय मनोभावे पंतप्रधानांनी यावेळी दृढ संकल्प करत राम मंदिराची वीट ठेवत एका नव्या पर्वाची सुरुवात केली.   

7/7

(सर्व छायाचित्रे- एएनआय)