पीएम मोदींना लागलाय वासराचा लळा; त्याचं नाव काय ठेवलंय माहितीय?

PM Modi : पंतप्रधान मोदींची ही भावनिक बाजू पाहून सारेच थक्क... नवा सदस्य... मोठ्या लाडानं कुरवाळत त्यांनी केलं वासराचं स्वागत

Sep 14, 2024, 15:02 PM IST

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका खास पाहुण्याला आपला वेळ दिला. हा पाहुणा सोशल मीडियावर बराच चर्चेत आला. 

1/7

आनंद

Pm Modi Shared welcomes A special guest Calf Deepjyoti photos

PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एक सुरेख व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि पाहता पाहता त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला. जिथं, पंतप्रधानांचा आनंदही गगनात मावेनासा झाल्याचं पाहायला मिळालं.   

2/7

वासरु

Pm Modi Shared welcomes A special guest Calf Deepjyoti photos

पंतप्रधानांच्या आनंदाचं कारण होतं एक वासरु. व्हिडीओतील दृश्यांनुसार पंतप्रधान यामध्ये एका वासरासोबत दिसत आहेत. त्याच्यासोबत खेळत आहेत. देवघरामध्ये त्याच्याकडे करुणेनं पाहत आहेत.   

3/7

कुतूहल

Pm Modi Shared welcomes A special guest Calf Deepjyoti photos

वासराची इवलिशी पावलं आणि त्याची चाल पाहताना पंतप्रधान भारावल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे वासरु म्हणजे पीएम मोदी यांच्या आवासातील एक नवं सदस्य आहे. दीपज्योती असं त्याचं नाव. 

4/7

सदस्य

Pm Modi Shared welcomes A special guest Calf Deepjyoti photos

'गाव: सर्वसुख प्रदा:' असं आपल्या शास्त्रांमध्ये म्हटलंच गेलं आहे असं सांगताना लोक कल्याण मार्गावरील पंतप्रधान आवासातील कुटुंबात एका नव्या सदस्याचं आगमन झाल्यांच त्यांनी X च्या माध्यमातून सांगितलं. 

5/7

दीपज्योती

Pm Modi Shared welcomes A special guest Calf Deepjyoti photos

पीएम आवास येथील गाईनं जन्म दिलेल्या वासराच्या कपाळावर ज्योतीसारखी खूण असल्यामुळं च्याला दीपज्योती असं नाव देण्यात आलं आहे. 

6/7

गायींची सेवा

Pm Modi Shared welcomes A special guest Calf Deepjyoti photos

पीएम आवास येथे अनेक गायी आहेत. मोदी या गायींची सेवा करतानाही अनेकदा सर्वांसमोर आले आहेत. या गाई अतिशय खास असून, त्या पुंगनूर प्रजातीच्या आहेत. 

7/7

गायीची प्रजाती

Pm Modi Shared welcomes A special guest Calf Deepjyoti photos

आंध्रप्रदेश इथं या गायींच्या प्रजाती प्रामुख्यानं आढळतात. त्यांची उंची फक्त अडीच ते तीन फूट इतकीच असते, ही जगातील सर्वात लहान गाय असून, ही प्रजाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहे असं सांगितलं जातं. या प्रजातींच्या गायीचं दूध अतिशय पौष्टीक समजलं जातं.