Solo Trip : सोलो ट्रीपचा प्लॅन करताय ? मग भारतातल्या 'या' सुंदर ठिकाणी नक्की भेट द्या

स्वत: विश्वास असला की माणूस एकटा हवं तिथे बिनधास्त भटकू शकतो. भारतातील अशीच काही सुंदर ठिकाणं आहेत, जिथे तुम्ही एकदा तरी सोलो ट्रीपला जायलाच हवं.    

Jul 28, 2024, 16:51 PM IST
1/7

गंगटोक

सिक्किममधलं 'गंगटोक' हा डोंगराळ प्रदेश आहे. त्यामुळे पावसाळी वारे अडले जातात आणि पाऊस जास्त पडतो. पावसात  गंगटोकमध्ये 17 ते  22 अंश सेल्सिअस इतकं तापमान असतं. पावसाळ्यात गंगटोकमध्ये रामटेक मठ, त्सुक ला खांग मठ,  पेमायांगत्से मठ हे बौद्ध संस्कृतीचं दर्शन देणाऱ्या मठांना पर्यटक कायमच गर्दी करतात.   

2/7

हंपी

तुम्ही जर इतिहासप्रेमी असाल तर हंपी तुम्हाला नक्की आवडेल. हेमाडपंथी प्रकारातील मंदिरं आणि  तथागत गौतम बुद्धांच्या लेण्या या हंपीची विशेष ओळख आहे. निसर्ग सौंदर्य आणि  स्थापत्त्यकलेचा उत्तम उदाहरण म्हणजे हंपीमधील प्राचीन मंदिरं आहेत. 

3/7

14 व्या शतकात विजयनगर साम्राज्याची हंपी शहर राजधानी होती.विजयनगर साम्राज्यात हंपी शहर हे शेती,व्यापार आणि देवीदेवळांच्या मंदिरांनी समृद्ध होते, इतिहासात सांगितलं जातं. 

4/7

वाराणसी

गंगा नदी आणि वाराणसीला धार्मिकदृष्ट्या महत्त्व जितकं आहे. तेवढंच वाराणसीच्या घाटावरुन दिसणारा सूर्यास्त पाहणं निसर्गप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरते.

5/7

मावळणारा सूर्य, संध्याकाळची  गार हवा, आणि गंगेचा पवित्र घाट म्हणजे निसर्गाने दिलेलं वरदान आहे. या ठिकाणी सूर्यास्त अनुभवण्यासाठी खास बोटींगची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. सोलो ट्रीपसाठी हे उत्तम ठिकाण आहे.  

6/7

मनाली

जम्मू काश्मीरचा बराचसा भाग हा दऱ्या खोऱ्यांनी वेढलेला आहे. बर्फाळ प्रदेशातल्या या ठिकाणी सूर्यास्त मनाला भूरळ घालतो. सुर्यौदयापासून ते सूर्यास्तापर्यंत बदलत जाणाऱ्या छटा, पांढराशुभ्र बर्फाचा डोंगर, संथ वाहणारी नदी आणि हवेतला गारवा. निसर्गाच्या सान्निध्यात असणारं हे ठिकाण पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. 

7/7

नैनिताल

हिमालय पर्वाताची श्रीमंती लाभलेलं उत्तराखंडमधील हे छोटसं गाव. चारही बाजूंनी डोंगराने वेढलेल्या ह्या ठिकाणी खास धुकं अनुभवण्यासाठी पर्यटक येतात. या ठिकाणाला तलावांचं शहर म्हणूनही ओळखलं जातं. ऊन,पाऊस आणि धुक्य़ाचा लपंडाव पाहायला पर्यटक कायमच नैनितालला भेट देतात.