'तो' आई होणार! भारताचा पहिला ट्रान्समेल गरोदर, फोटोशूट करत दाखवला बेबी बंप

Trans Couple Pregnant : भारतातला पहिलं ट्रान्सजेंडर कपल (Transgender Couple) जिया (jiya) आणि जाहादने (jahad) सोशल मीडियावर (Social Media) आपल्या घरी नवा पाहुणा येणार असल्याची घोषणा केली आहे. जिया आणि जाहदने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Instagram) काही फोटो शेअर केले आहेत. कोझीकोड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गर्भधारणेसाठी या कपलला कोणत्याही शारिरीक आव्हानाला सामोरं जावं लागलं नाही. जिया आणि जाहादने लिंग परिवर्तन केलं आहे.

Feb 04, 2023, 15:26 PM IST
1/5

जिया आणि जाहाद हे गेले तीन वर्ष एकत्र राहत असून ते केरळाचे आहेत. जियाचा जन्म पुरुष म्हणून झाला तो लिंग बदल करुन महिला झाली. तर जाहद ही महिला होती ती आता पुरुष बनली आहे. 

2/5

जन्माला येणाऱ्या मुलाला मिल्क बँकच्या (Milk Bank) माध्यमातून ब्रेस्ट फिडिंग करण्याचा निर्णय दोघांनी घेतला आहे. 

3/5

भारतात मुलाला जन्माला घालणारं हे पहिलं ट्रान्समॅन कपल (Tranmale) आहे. शस्त्रक्रियेनंर जाहदने आपले ब्रेस्ट काढून टाकले. पण गर्भाशय आणि काही अवयव हे महिलेचेच असल्याने गर्भधारणेत काही अडचण आली नाही.

4/5

जियाने एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली असून यात तीने म्हटलंय, मी जन्मताच एक महिला होती, माझ्यात एक स्त्री होती, माझं स्वप्न होतं, की मला एक मुल व्हावं आणि त्याने मला आई म्हणावं.

5/5

मिळालेल्या माहितीनुसार गर्भधारणेच्याआधी या कपलने मुल दत्तक घेण्याची योजना आखली होती. यासाठी लागणाऱ्या प्रक्रियेबाबताही त्यांनी चौकशी केली. पण  हे कपल ट्रन्सजेंडर असल्याने कायदेशीर प्रक्रिया खूप आव्हानात्मक होती.