Photos: अवघ्या 9 चेंडूंचा पाहुणा गिल, तिसऱ्या टेस्टमध्ये भोपळाही फोडता आला नाही

IND vs ENG 3rd Test: राजकोटमध्ये तिसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल पुन्हा फेल गेला आहे.  

Surabhi Jagdish | Feb 16, 2024, 12:39 PM IST

IND vs ENG: राजकोटमध्ये तिसरा टेस्ट सामना खेळवण्यात येतोय. या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल पुन्हा फेल गेला आहे.  

1/7

भारतीय कर्णधार रोहित शर्मा यांनी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्ट क्रिकेट सामन्यात गुरुवारी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 

2/7

टीम इंडियाची सुरुवात पहिल्याच दिवशी चांगली झाली नाही. 

3/7

या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिलकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र तो पुन्हा एकदा फेल गेल्याचं दिसून आलं. 

4/7

जशस्वी जयस्वालनंतर मार्क वुडने शुभमन गिलची विकेट घेत टीम इंडियाला दुसरा धक्का दिला. 

5/7

गेल्या अनेक दिवसांपासून गिलचा वाईट फॉर्म सुरु आहे. मागील सामन्यात त्याने शतक झळकावले होते, परंतु इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये तो खातंही उघडू शकला नाही.

6/7

यामुळे चाहत्यांनी गिलला पुन्हा एकदा ट्रोल करायला सुरुवात केली आहे. 

7/7

इंग्लंडविरुद्धच्या ५ सामन्यांच्या मालिकेत गिल दुसऱ्यांदा शुन्यावर बाद झाला आहे. हैदराबाद टेस्टमध्येही गिलला भोपळाही फोडता आला नव्हता.