मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी 'या' 6 सवयी ठरतात कारणीभूत, तुमच्यात असतील तर आताच करा बदल

मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी अनेकदा आपल्या काही वाईट सवयीच कारणीभूत असतात. पण अनेकदा आपल्याला त्याची कल्पनाच नसते.   

Feb 15, 2024, 16:50 PM IST
1/7

मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी अनेकदा आपल्या काही वाईट सवयीच कारणीभूत असतात. पण अनेकदा आपल्याला त्याची कल्पनाच नसते.   

2/7

चुकीच्या पद्धतीने बसणं

आपण कशाप्रकारे असतो त्यावरही आपलं मानसिक आरोग्य अवलंबून असतं. जे लोक चुकीच्या पद्धतीने बसतात त्यांच्या मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होतो. असे लोक नेहमी नकारात्मक आणि तणावात असतात. तसंच इतरांच्या तुलनेत ते अधिक थकतात.   

3/7

नीटनेटकं न राहणं

जर एखाद्याला नीटनेटकं राहण्याची सवय नसेल तर हीच सवय पुढे जाऊन मानसिक आरोग्य बिघडण्यासाठी कारणीभूत ठरु शकते.   

4/7

स्वत:ची खिल्ली उडवणं

हसणं आरोग्यासाठी चांगलं असतं. पण जेव्हा तुम्ही स्वत:चीच खिल्ली उडवू लागता तेव्हा मात्र कुठेतरी तुम्ही आपल्या सन्मानाला ठेच पोहोचवता. ही सवय भविष्यात तुमच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करु शकते.   

5/7

सेल्फी घेणं

सेफ्फी घेणं ही तशी आता फारच सर्वसामान्य बाब आहे. प्रत्येकजण आजकाल सेल्फी काढत असतो. पण असं करत आपण स्वत:ची तुलना दुसऱ्याशी करत असतो. यानंतर त्यांना आपल्यात कमतरता भासू लागतात.   

6/7

एकाच वेळी अनेक कामं करणं

एकाच वेळी अनेक कामं करण्याची सवय मानसिक आरोग्या बिघडण्यासाठी कारणीभूत ठरु शकते. हे लोक तणावात राहतात आणि भविष्यात मानसिक आरोग्याच्या समस्येला तोंड देतात.   

7/7

नेहमी तक्रार करणं

जे नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी तक्रार करतात त्यांच्याच अजाणतेने नकारात्मक भावना निर्माण होते. यामुळे मानसिक आरोग्य बिघडतं.