Covid-19 : स्थानिकांकडून महानगर पालिका कर्मचाऱ्यांना मारहाण
पालिकेचे कर्मचारी स्थानिकांना क्वारंटाइन करण्यासाठी गेले होते
कर्नाटकमध्ये बृहद बंगळुरू महानगरपालिकेच्या कमगारांना स्थानिकांकडून मारहाण करण्यात आली आहे. महानगर पालिकेचे हे कामगार कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना क्वारंटाइन करण्यासाठी गेले होते. परंतु स्थानिकांनी त्यांच्यावर हल्ला केला. तर काही स्थानिकांनी क्वारंटाइनसाठी होकार दिला. या घटनेची माहिती पोलिसांना कळताच ते घटना स्थळी दाखल झाले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली.