Indian Railways : ईशान्य रेल्वेचं बदलतं रूप; प्रवास होणार सुखकर

'उत्कृष्ट रेल कोच' योजने अंतर्गत भारतीय रेल्वेचा अनोखा प्रयत्न  

Aug 04, 2020, 11:02 AM IST

प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात म्हणून भारतीय रेल्वे सतत नवे प्रकल्प हाती घेत असते. आता देखील रेल्वेच्या डब्यांमध्ये होणारे बदल प्रवाशांना एक आनंदाचा क्षण देवून जात आहेत. त्यामुळे आता  उत्कृष्ट रेल्वे योजनेच्या अंतर्गत अनेक नवे बदल रेल्वे डब्यांमध्ये होताना दिसत आहेत. 

1/5

'उत्कृष्ट रेल कोच' (Utkrusht rail coach) या योजने अंतर्गत आता ईशान्य रेल्वेच्या ३७ डब्यांना नवं रूप प्राप्त झालं आहे.   

2/5

या ३७ डब्यांना विविध रंगांनी रंगवण्यात आलं आहे. रेल्वे संग्रहालय आणि कुशीनगर येथील बौद्ध मंदिरासह ऐतिहासिक स्थळांची चित्रे गाड्यांमध्ये रेखाटण्यात आले आहेत.   

3/5

भारतीय रेल्वेने २०१८-१९ या वर्षी सुरू केलेल्या उत्कृष्ट योजने अंतर्गत आतापर्यंत तब्बल १४० रेल्वेगाड्यांना नवं रूप देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये २० ट्रेनचं काम पश्चिम रेल्वेला देण्यात आलं आहे.   

4/5

त्याचबरोबर रेल्वेच्या स्वच्छतागृहातही अनेक बदल करण्यात आले आहेत.  

5/5

संपूर्ण ट्रेन काचेच्या आणि रंगीबेरंगी विनाइल रॅपिंगने सजली जात आहे. प्रत्येक डब्ब्यामध्ये एलईडी लाइटिंग बसविण्यात आली आहे.