डार्क चॉकलेटचा असा वापर करा, चेहऱ्यावर येईल चकाकी

Homemade Chocolate Face Masks For Glowing Skin: लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत अनेकांना चॉकलेट आवडतं, पण तुम्हाला माहितेय का डार्क चॉकलेटचा फेसपॅक त्वचेसाठी गुणकारी मानलं जातं.    

Feb 12, 2024, 10:56 AM IST

 

 

1/7

डार्क चॉकलेटमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे गुणधर्म जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे हा फेसपॅक लावल्यास सनटॅन दूर होण्यास मदत होते.

2/7

डार्क चॉकलेटचा फेसपॅक त्वचेतील ओलावा टिकवून ठेवतं. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर तुम्ही हा फेसपॅक वापरू शकता.   

3/7

डार्क चॉकलेटमध्ये कॅफेनचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्याने सुरकुत्या कमी होऊन चेहरा उजळण्यास मदत होते.

4/7

चेहऱ्यावर चकाकी येण्याकरता तसंच मुरुमांच्या समस्येवर हा फेसपॅक फायदेशीर आहे.    

5/7

दुधात डार्क चॉकलेट पावडर मिसळून चेहऱ्याला लावल्यास त्वचा मुलायम होते.  

6/7

दह्यामध्ये लॅक्टिक ऍसिड मुबलक असतं, दही आणि डार्क चॉकलेट पावडर एकत्र करून लावल्याने मृतपेशी दूर होतात. 

7/7

ओट्स आणि चॉकलेट पावडर एकत्र करून चेहऱ्यावर मसाज केल्याने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते.