आज पेट्रोल-डिझेल स्वस्त की महाग? गाडीची टाकी फुल्ल करण्यापूर्वी जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

Petrol Diesel Price Today : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार झाले आहेत. त्यामुळे तेल कंपन्या इंधनाचे दर वाढवण्याची शक्यता आहे. आज ब्रेंट क्रूड प्रति बॅरल $82.57 आणि WTI क्रूड प्रति बॅरल $78.18 वर व्यापार करते. आजही राष्ट्रीय स्तरावर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. परंतु, राज्यातील विविध शहरांमध्ये तेलाच्या किमतीत फारच कमी बदल झाला आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यातील आजची किंमत जाणून घ्या....

Feb 25, 2024, 11:28 AM IST
1/7

महाराष्ट्रात पेट्रोल 57 पैशांनी तर डिझेल 54 पैशांनी स्वस्त झाले आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 60 पैशांनी तर डिझेल 56 पैशांनी स्वस्त झालं आहे. राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात आली आहे. याशिवाय हिमाचल प्रदेश, हरियाणा, गुजरात आणि जम्मू-काश्मीरमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढत आहेत.

2/7

आज महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 106.94 रुपये प्रति लिटर आहे. गेल्या महिन्याच्या शेवटच्या तारखेला महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 107.06 रुपये प्रति लिटर होती, त्या तुलनेत आता 0.12 टक्क्यांनी घट झाली आहे. गेल्या 10 दिवसांत महाराष्ट्रात पेट्रोलचा सरासरी दर 106.94 रुपये प्रतिलिटर झाला आहे. 

3/7

मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर

4/7

पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.17 रुपये तर डिझेलचा दर 92.68 रुपये प्रतिलिटर आहे.

5/7

नाशिकमध्ये पेट्रोल 105.89 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 92.42 रुपये प्रतिलिटर आहे.

6/7

नागपुरात पेट्रोलचा दर 106.28 रुपये तर डिझेलचा दर 92.68 रुपये प्रतिलिटर आहे.

7/7

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.35 रुपये दराने विकले जाते. डिझेल 95.07 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.