पेट्रोल-डिझेल भरायला चाललात? दर वाढले की घटले? लगेच चेक करा

Today Petrol Diesel Price : तुम्ही जर पेट्रोल आणि डिझेल भरायला जाणार असाल तर एकदा आजचे दर नक्की तपासा. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी म्हणजेच OMC ने 16 फेब्रुवारीसाठी पेट्रोल आणि डिझेलचे दर सुधारित केले आहेत. परंतु राष्ट्रीय स्तरावर आजही पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत सध्या पेट्रोल 106.31 रुपये आणि डिझेल 94.27 रुपये प्रतिलिटर दराने उपलब्ध आहे.

Feb 16, 2024, 09:57 AM IST
1/8

आंतरराष्ट्रीय बाजारात आज कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली असून अनेक राज्यांमध्ये इंधनाचे दर बदलले आहेत. त्यामुळे तुम्ही पेट्रोल किंवा डिझेल गाडीमध्ये भरण्याचा विचार करत असाल तर आजचे दर एकदा नक्की तपासा...

2/8

जागतिक बाजारात स्वस्त झालेल्या कच्च्या तेलाच्या दरात आज (16 फेब्रुवारी) पुन्हा एकदा 1 डॉलरने वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत जवळपास $1 ने वाढून $82.86 प्रति बॅरल झाली. डब्ल्यूटीआय तेलाचा दर देखील आज वाढला आहे आणि प्रति बॅरल $ 78.11 वर पोहोचला आहे.

3/8

भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले आहेत. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अचानक बदल झाला असून पेट्रोलचा दर प्रतिलिटर 105.96 रुपये तर डिझेलचा दर 92.49 रुपये प्रतिलिटर आहे.   

4/8

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.31 रुपये तर डिझेलचा दर 94.27 रुपये प्रतिलिटर आहे.  

5/8

पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटर 106.17 रुपये तर डिझेलचा दर 92.68 रुपये प्रतिलिटर आहे.

6/8

नाशिकमध्ये पेट्रोल 106.54 रुपये प्रतिलिटर दराने विकले जात आहे. डिझेलचा दर 93.05 रुपये प्रतिलिटर आहे.

7/8

नागपुरात पेट्रोलचा दर 106.04 रुपये तर डिझेलचा दर 92.59 रुपये प्रतिलिटर आहे.

8/8

छत्रपती संभाजीनगरमध्ये पेट्रोल 108.68 रुपयांना विकले जाते. डिझेल 95.38 रुपये प्रति लीटर दराने उपलब्ध आहे.