जगातला सर्वात महागडा चित्रपट, बनवण्यासाठी 12 वर्ष, कमाई 22,000,368 कोटीं... गोविंदाचा झाला होता अपमान
World Expensive Film : एक असा चित्रपट होता ज्या चित्रपटाने प्रदर्शित होताच संपूर्ण जगात खळबळ उडवून दिली होती. या चित्रपटाचा पहिला भाग बनवण्यासाठी दिग्दर्शकाला तब्बल 12 वर्ष लागली होती. कारण त्यावेळी तंत्रज्ञान इतकं अद्ययावत नव्हतं. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी आपली पू्र्ण तिजोरी रिकामी केली. जगातील हा सर्वात महागडा चित्रपट म्हणून ओळखला जातो. या चित्रपटाने कोट्यवधीची कमाई केली केली. पण या चित्रपटामुळे बॉलिवूडचा राजा बाबू अर्थात गोविंदा चांगलाच ट्रोल झाला होता.
1/9
जगातला सर्वात महागडा चित्रपट, बनवण्यासाठी 12 वर्ष, कमाई 22,000,368 कोटीं... गोविंदाचा झाला होता अपमान
2/9
3/9
जेम्स कॅमेरॉन यांना लहानपणापासूनच विज्ञानकथांची पुस्तके वाचण्याची आवड होती. असा चित्रपट बनवण्याचा विचार त्यांच्या मनात बराच काळ घोळत होता. 'टायटॅनिक' बनवताना जेम्सने 'अवतार' या सायन्स फिक्शन चित्रपटाची 80 पानी कथा लिहिली होती. इतकंच नाही तर टायटॅनिक रिलीज होताच त्यांनी 1997 मध्ये त्यांच्या पुढच्या चित्रपटाची घोषणा केली होती.
4/9
1997 मध्ये जेम्स कॅमरॉन यांनी अवतार चित्रपटाची घोषणा केली खरी पण हा चित्रपट बनवणं किती अवघड आहे याचा त्यांना अंदाज आला. हा चित्रपट बनवण्यासाठी हायटेक टेक्नोलॉजची आवश्यकता होती. पण चित्रपटातील बहुतांश पात्रे ही काल्पनिक होती आणि ती केवळ हायटेक तंत्रज्ञानाद्वारेच पडद्यावर आणता येणार होती. त्यामुळे त्यांनी चित्रपटावर काम करण्याचं काही काळ थांबवलं.
5/9
वर्ष 2006 मध्ये कॅमरॉन यांनी पुन्हा या चित्रपटावर काम करायला सुरुवात केली. चित्रपटात दाखवण्यात आलेल्या एलिअन्ससाठी त्यांनी वेगळी भाषा तयार केली. ही भाषा डॉ पॉल फ्रॉमर यांनी तयार केली होती. इतकंच नाही तर चित्रपटातील काल्पनिक पात्रांचे कपडे डिझाईन करण्यासाठी तब्बल 2 वर्ष लागली. याशिवाय काल्पनिक पात्रांचे हावभाव टिपण्यासाठी एक वेगळा कॅमेरा तयार करण्यात आला. त्यानंतर अॅनिमेशनचा वापर करण्यात आला.
6/9
या चित्रपटाचं 2006 मध्ये चित्रीकरण सुरु करण्यात आलं आणि 2009 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. अवतार चित्रपटाचं बजेट 237 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात 1800 करोड रुपये इतकं होतं. पण या चित्रपटाने तुफान कमाई केली. या चित्रपटाची जागतिक कमाई होती 20 हजार 368 कोटी रुपये. हा चित्रपट जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला.
7/9
8/9
गोविंदाने आपल्या मुलाखतीत म्हटलं होतं 'या चित्रपटाला अवतार हे नाव मीच दिलं होतं, हा चित्रपट खूप चालणार असंही मी त्यांना सांगितलं होतं. या चित्रपटात मी काम करावं असं कॅमरॉन यांना वाटत होतं. पण माझ्या सारख्या अभिनेत्याला शरीरावर पेंट करणं अवघड होतं. त्यामुळे त्यांची माफी मागितली. पण मी सांगितल्याप्रमाणे हा चित्रपट सुपरहिट झाला, असं गोविंदाने या मुलाखतीत सांगितलं होतं.
9/9