Personality Test: पायाचा अंगठा सांगतो तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव, एकदा खात्री करुनच पाहा!

ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी त्याच्या शरीररचनेवरुनही ओळखता येतो. पायाची बोटं पाहूनही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सांगता येतो, असं म्हणतात. 

Mansi kshirsagar | Dec 09, 2024, 15:29 PM IST

Personality Test: ज्योतिषशास्त्रानुसार एखाद्या व्यक्तीचा स्वभाव ओळखण्यासाठी त्याच्या शरीररचनेवरुनही ओळखता येतो. पायाची बोटं पाहूनही एखाद्या व्यक्तीचा स्वभाव सांगता येतो, असं म्हणतात. 

1/7

Personality Test: पायाचा अंगठा सांगतो तुमचं व्यक्तिमत्व आणि स्वभाव, एकदा खात्री करुनच पाहा!

Personality Test  thumb shapes have been linked to specific personality

प्रत्येकाचं व्यक्तिमत्व वेगळं असतं, बोलणं वेगळं असते अनेकदा त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व व स्वभावाचा अंदाज बांधता येत नाही. आज आम्ही तुम्हाला अंगठ्यावरुन व्यक्तीचा स्वभाव कसा ओळखावा, याची माहिती देणार आहोत. 

2/7

 पायाच्या इतर बोटांपेक्षा अंगठा मोठा असेल तर अशा व्यक्तीचं व्यक्तिमत्व आकर्षक असते. या व्यक्ती क्रिएटिव्ह असतात व त्यांना नवीन गोष्टी शिकायला आवडतात.

3/7

 एखाद्या व्यक्तीच्या पायाचा अंगठा वाकडा असेल तर अशा व्यक्ती योग्य सल्ला देतात. एखाद्या गोष्टीचा नीट विचार करुन निर्णय घेतात. अशा व्यक्ती संवेदनशील असतात. 

4/7

पायाचा अंगठा हा अंगठ्याच्या शेजारच्या बोटापेक्षा लहान असेल तर या व्यक्तींना एकांतात राहायला आवडते. त्यांना मैत्री करायला आवडते तसंच, ते खूप ज्ञानी असतात. 

5/7

अंगठा व तर्जनी यांची उंची समान असेल तर अशा व्यक्तींना नवीन व्यक्तींना भेटायला आवडतं. प्रवास करायला आवडतं.

6/7

 पायाचा अंगठा सरळ असणाऱ्या व्यक्तीचं व्यक्तिमत्व एकदम साधं असतं. अशा व्यक्ती शिस्तप्रिय असते. प्रत्येक गोष्टी ते नियमानुसारच करतात. 

7/7

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)