आयुष्मान खुरानाच्या जीवनातील ६ महत्वाचे किस्से

आयुष्मानच्या वाढदिवशी जाणून घ्या खास गोष्टी 

| Sep 14, 2020, 16:37 PM IST

मुंबई : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुराना आपल्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या मनात घर करत आहे. चंदीगडच्या ऍस्ट्रोलॉजरच्या मुलाचं नशिब एवढं चमकेल असं कुणालाच वाटलं नसेल. सिनेसृष्टीत येऊन आयुष्मानला जास्त काळ झालेला नाही पण त्यानी गाठलेली उंची ही खरंच कौतुकास्पद आहे. यामुळे आयुष्मानच्या जीवनातील या सहा गोष्टी जाणून घेणं त्याच्या चाहत्यांच कर्तव्यच आहे. 

1/6

जेव्हा एका मुलीने आयुष्मानकडे मागितले होते 'स्पर्म'

जेव्हा एका मुलीने आयुष्मानकडे मागितले होते 'स्पर्म'

आयुष्मान खुराना हा किस्सा एका मुलाखतीत सांगितला होता. जेव्हा तो त्याच्या आईसोबत मॉलमध्ये गेला होता. तेव्हा एका मुलीने चक्क आयुष्मानकडे त्याचेे स्पर्म मागितले. हा किस्सा तेव्हाचा आहे जेव्हा आयुष्मानचा 'विक्की डोनर' हा सिनेमा सुपरहिट झाला होता. 

2/6

बिग चाय- मान न मान, मैं तेरा आयुष्मान

बिग चाय- मान न मान, मैं तेरा आयुष्मान

२००४ ची गोष्ट आहे. जेव्हा आयुष्मान बिग एफएमवर RJ चं काम करत होता. तेव्हा तो सकाळी चहा सोबत एक शो होस्ट करत होता.  नाम था ‘बिग चाय- मान न मान, मैं तेरा आयुष्मान असं या शो चं नाव होतं. चंदीगडमध्ये जन्मलेल्या आयुष्मानला पहिली नोकरी ही दिल्लीत मिळाली. 

3/6

वॉइस ऑफ यंगिस्तान

वॉइस ऑफ यंगिस्तान

रेडिओनंतर आयुष्मानने टीव्हीकडे आपलं लक्ष वळवलं. आयुष्मान 'MTV Rodies' सिझन २ मध्ये विजेता होता. 'पेप्सी एमटीवी वाट्सअप द वॉइस ऑफ यंगिस्तान'चा होस्ट देखील आयुष्मान राहिला आहे.   

4/6

'विकी डोनर' सिनेमातल्या किसिंग सिनवर पत्नीची नाराजी

'विकी डोनर' सिनेमातल्या किसिंग सिनवर पत्नीची नाराजी

आयुष्मानचं लग्न खूप अगोदर झालं होतं. त्याची पत्नी ताहिरा कश्यप स्वतः एक आर्टिस्ट आहे. विक्की डोनर सिनेमातील आयुष्मानच्या किसिंग सीनवर ताहिरा अतिशय नाराज झाली होती. तिचं रागावण आयुष्मानला खूप भारी पडलं होतं.

5/6

गायक देखील आहे आयुष्मान

गायक देखील आहे आयुष्मान

वयाच्या चौथ्यावर्षी माधुरी दीक्षितचा 'तेजाब' सिनेमा पाहून आयुष्मानने अभिनेता बनण्याचं स्वप्न पाहिलं. आयुष्मानने RJ म्हणून करिअरला सुरूवात केली. यामध्ये दररोज गाणी आणि संगिताशीच त्याचा संबंध येत असे. आयुष्मानने स्टार प्लसवरील म्युझिकल शो 'म्युझिक का महामुकाबला' होस्ट केला होता. यादरम्यानच आयुष्मानला देखील संगीताची आवड निर्माण झाली. आयुष्मान आतापर्यंत अनेक अल्बममध्ये आणि १३ सिनेमांच्या २० ते २५ गाण्याला आवाज दिला. 

6/6

जेव्हा आयुष्मानच्या मागे 'गे' लागतात

जेव्हा आयुष्मानच्या मागे 'गे' लागतात

आयुष्मान खुरानाने चाहत्यांना सर्वात मोठा धक्का दिला जेव्हा त्याने 'शुभ मंगल सावधान' सिनेमात 'गे' ची भूमिका साकारण्याचा निर्णय घेतला. मात्र खूप कमी लोकांना माहित आहे की, आयुष्मान समलैंगिक समुहात अडकता अडकता वाचला. एका मुलाखतीत त्याने ही माहिती दिली.