सायना नेहवालने आईसह केली अमरनाथ यात्रा; फोटो पाहून दोघींच्याही इच्छाशक्तीला कराल सलाम

Saina Nehwal Amarnath Yatra Photos: ऑलिम्पिक पदक विजेती बॅटमिंटनपटू सायना नेहवालने बुधवारी जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील बाबा अमरनाथ यांच्या गुंफेत जाऊन बर्फापासून तयार होणाऱ्या नैसर्गिक शिवलिंगाचं दर्शन घेतलं. सोशल मीडियावरुन सानियाने आपल्या अमरनाथ यात्रा प्रवासाचे फोटो शेअर केले असून हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत. पाहूयात हे फोटो...

| Jul 13, 2023, 12:41 PM IST
1/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

11 जुलै रोजी सायनाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर विमानतळावर क्लिक केलेला आई-वडिलांबरोबरचा फोटो पोस्ट केला होता.

2/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

त्यानंतर सायानाने काश्मीर या एका शब्दाच्या कॅप्शनसहीत आपल्या आई-वडिलांबरोबरचे फोटो शेअर केले होते.

3/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

सोनमर्गमधून काश्मीरच्या खोऱ्यातील डोंगररांगा दिसणारा एक फोटोही सायनाने 11 जुलै रोजी पोस्ट केला होता. 

4/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

आईबरोबर अमरनाथ यात्रेला सुरुवात करत असल्याचंही सायानाने एका पोस्टमध्ये काही फोटो शेअर करताना म्हटलेलं.

5/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

अमरनाथ यात्रेच्या मार्गावर क्लिक केलेले काही सेल्फीही सायनाने शेअर केले.

6/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

दरी खोऱ्यांमधून नदीच्या बाजूने चालत हा प्रवास करत सायना हा प्रवास एन्जॉय करत असल्याचं फोटोंमधून दिसत आहे. 

7/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

प्रवासादरम्यान थंडी जाणवत असल्याचं सायनाने शेअर केलेल्या फोटोंमधून दिसून येत आहे.

8/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

'आईबरोबर अमरनाथ यात्रा' अशा कॅप्शनसहीत सायनाने आईसोबतचा सेल्फी शेअर केला आहे.

9/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

अमरनाथ यात्रेच्या वाटेत भारतीय लष्कराच्या एका तुकडीबरोबर सायना आणि तिच्या आईने आवर्जून फोटो काढून घेतला. या सैनिकांबरोबर सायनाने गप्पाही मारल्या.

10/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

उत्तम प्रकारे आम्हाला दर्शन घेता आलं असं सायनाने दर्शनानंतर पोस्ट केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलंय.

11/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

मनाप्रमाणे दर्शन घेता आल्याने मला फार आनंद झाला आहे, असंही सायनाने म्हटलं आहे.

12/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

अमरनाथ येथे शिवलिंगांचं दर्शन झाल्यानंतरही सायनाने आईबरोबरचा फोटो शेअर केला आहे.

13/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

परतल्यानंतर सायनाने कुटुंबाबरोबर नदी किनारी असलेल्या एका हॉटेलवर डिनर केल्याचे फोटोही शेअर केले आहेत.

14/14

Saina Nehwal Amarnath Yatra Photos

प्रकृतीसंदर्भातील समस्यांमुळे सायनाचे वडील पूर्ण यात्रा करु शकले नाही असं समजतं.