मान्सूमध्ये मुंबईतील 5 धोकादायक डॅम, पावसाळ्यात होऊ शकते मोठी दुर्घटना

Risky Dams During Monsoon in Mumbai : पावसाळा सुरु झाल्यानंतर पुणे आण मुंबईजवळ हमखास विकेंडला फिरायला जातात. हिल्स स्टेशन असो किंवा धबधबा इथे पर्यटकांची मोठी गर्दी मान्सून काळात दिसून येते. 

| Jul 01, 2024, 19:45 PM IST
1/7

भुशी धरणाच्या बॅक वॉटरमध्ये पावसाचा आनंद लुटण्यासाठी गेलेल्या कुटुंबाला जल समाधी मिळाली. लहान मुलांसोबत 10 जण पाण्यात वाहून गेले.

2/7

ही घटना ताजी असताना मुळशीच्या ताम्हिणी घाटात सेल्फीच्या नादात जीव गमावलाय. जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरायला आला होता. त्यातील एका तरुणाने पाण्यात उडी मारली आणि त्यात वाहून गेला. 

3/7

वसईमधील चिंचोटी डॅमला पावसाळ्यामध्ये पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. या डॅमवर पावसाळ्यात पाण्याची पातळी वाढण्यासह पाण्याचा प्रवाह वाढल्यास धोकादायक ठरतं.   

4/7

पनवेलमधील गाडेश्वर डॅमही सर्वाधिक धोकादायक डॅम म्हणून प्रसिद्ध आहे. इथे मान्सून काळात यापूर्वी असंख्य दुर्घटनाच्या घटना घडल्या आहेत. 

5/7

इगतपुरीमधील वैतरणा डॅमही मान्सूनमध्ये धोकादायक मानलं जातं. येथेही मान्सूनमध्ये पर्यटकांची गर्दी पाहिला मिळते. इगतपुरीच्या आसपास फिरण्यासाठी अनेक स्थळं असल्याने पर्यटकांसाठी हे आवडत ठिकाण असतं. 

6/7

बदलापूरजवळील कोंडेश्वरदेखील धोकादायक डॅमपैकी एक असून गेल्याच आठवड्यात एका तरुणाचा वाहत्या पाण्यात बुडाल्याने जीव गमावला होता. 

7/7

या लिस्टमध्ये पुढचं नाव आहे टिटवाळ्यातील काळू डॅम. हे देखील धोकादायक असून मान्सूनमध्ये काळू डॅमच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते, त्यामुळे इथे जाण्यास प्रशासन मनाई करतं पण पर्यटक ऐकत नाहीत.