Unique Hotel: ना दारं, ना खिडक्या, ना भिंती.. पण या हॉटेलचं भाडं पाहून पायाखालची जमीन सरकेल

Wall Less Doerless Hotel With Majestic View: फाइव्ह स्टार हॉटेल म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर काय येतं? छान लोकेशन, मस्त बाल्कनी, सुंदर व्ह्यू, उत्तम फर्नीचर असलेला आलीशान रुम वगैरे वगैरे. पण जगात एक असं फाइव्ह स्टार हॉटेल आहे जिथे साध्या भिंतीही नाहीत. याच हॉटेलबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. या हॉटेलच्या एका रात्रीचा स्टे हा तुमच्या मंथली सॅलरीपेक्षाही अधिक आहे हे विशेष...

Mar 30, 2023, 16:53 PM IST
1/9

null stern hotel

भटकंती आली म्हणजे जिथे जातो त्या ठिकाणी राहण्यासाठी आवश्यक असलेली हॉटेल्सही आलीच. सामान्यपणे भटकंतीसंदर्भातील प्लॅनिंग करताना चांगल्या हॉटेल्सची बुकींग आधीच करुन ठेवण्याला लोक प्राधान्य देतात. हॉटेल बुक करताना चांगला बेड, बाथरुम, खिडक्या यासारख्या गोष्टी पाहिल्या जातात. मात्र असं असतानाच सध्या सोशल मीडियावर एक असं हॉटेल व्हायरल होतं आहे ज्यात हे काहीच नाही. (सर्व फोटो - instagram/nullstern_theonlystarisyou वरुन साभार)

2/9

null stern hotel

या हॉटेलमधून 360 डिग्री व्ह्यू दिसतो. हे हॉटेल स्वित्झर्लंडमध्ये आहे. या हॉटेलमधून स्विझ एल्प्स पर्वतांचं दर्शन करता येईल. जगातील सर्वात सुंदर डोंगररांगामध्ये स्विझ एल्प्स पर्वांचा समावेश होतो.

3/9

null stern hotel

या हॉटेलचं वैशिष्ट्य म्हणजे याला ना भिंती आहेत, ना दारं ना छप्पर. या हॉटेलचं नावं नल स्टर्न असं आहे.

4/9

null stern hotel

हॉटेलची स्थापना करणाऱ्या कंपनीच्या दाव्यानुसार वॉल लेस व्ह्यूज यामधून मिळतो. या हॉटेलची संकल्पना नल स्टर्न यांच्या अंडरग्राउंड बंकरमधून घेण्यात आली आहे.

5/9

null stern hotel

हे हॉटेल झिरो रियल इस्टेट कंपनीच्या मालकीचं असून त्याची स्थापना 2016 साली करण्यात आली आहे. हे भिंती नसलेलं हॉटेल तब्बल 6463 फूट उंचीवर आहे.

6/9

null stern hotel

हॉटेलच्या फोटोंवरुन आलेल्या पाहुण्यांना असं उघड्यावर रहायला सांगितलं जातं असं तुम्हाला वाटत असेल पण तसं नाहीय. या ठिकाणी एक बटलर सेवेसाठी कायम हजर असतो.

7/9

null stern hotel

हा बटलर अगदी या भिंती नसणाऱ्या हॉटेलच्या लोकेशनवर जोरात वारा आला तरी अंथरुण, पांघरुण करण्यासाठी तो मदत करतो.

8/9

null stern hotel

स्वित्झर्लंडच्या वेगवगेळ्या भागांमध्ये या हॉटेलच्या ब्रँच आहेत असं कंपनीने सांगितलं असून त्याचे फोटो या हॉटेलच्या नावाने सुरु करण्यात आलेल्या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर केले जातात.

9/9

null stern hotel

आता या हॉटेलचे फोटो पाहिल्यानंतर या असल्या हॉटेलमध्ये राहण्यासाठी किती पैसे मोजावे लागतील असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असणार. या हॉटेलमध्ये राहणाऱ्यासाठी प्रत्येक रात्रीसाठी 273 युरो म्हणजेच भारतीय चलनानुसार 27 हजार 776 रुपये मोजावे लागतात.