Navneet Rana: हिंदू शेरनी! काळा पोशाख, डोक्यावर भगवा फेटा आणि बुलेट स्वारी... नवनीत राणांचे Photos व्हायरल

अनिरुद्ध दवाळे, झी मीडिया, अमरावती : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) या आपल्या आक्रमक भूमिकेमुळे आणि वक्तव्यांमुळे नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेत असतात. हनुमाना चालिसावरुन (Hanuman Chalisa) ठाकरे गटाला (Thackeray Group) खुलं आव्हान दिल्यानंतर त्यांची अधिकच चर्चा झाली. त्यांच्या डान्सचे व्हिडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. आता त्यांचा एक नवा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. रामनवमीच्यानिमित्ताने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांचा नवा अंदाज पाहिला मिळालाय.

Mar 30, 2023, 16:59 PM IST
1/6

खासदार नवनीत राणा यांनी राम नवमीनिमित्त राज्यातील जनतेला खास अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत. नवनवीत राणा यांनी एक व्हिडिओ शेअर केला असून यात एका निर्जन रस्त्यावर त्या बुलेट चालवताना दिसत आहेत. 

2/6

व्हिडिओच्या सुरुवातील नवनीत राणा यांनी 'ना हार की फिकर करते है, ना जित का जिकर करते है.. जय श्रीराम' असं म्हणत खास अंदाजात त्यांनी बुलेट स्वारी केली आहे. 

3/6

या व्हिडिओत नवनीत राणा यांनी काळा ड्रेस परिधान केला असून डोक्याला भगवा गमछा बांधला आहे. नवनीत राणा यांचा हा लूक विशेष उटून दिसत आहे. 

4/6

6 एप्रिलला हनुमान जयंतीनिमित्ताने नवनीत राणा अमरावतीमध्ये हजारो लोकांच्या उपस्थितीत हनुमान चालिसाचं पठण करणार आहेत. अमरावतीत 111 फुट उंचीची भव्य हनुमान मूर्ती उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम त्याच दिवशी केला जाईल. 

5/6

मुंबई, दिल्ली, अयोध्या आणि अमरावतीत खासदार नवनीत राणा यांचे बॅनर लावण्यात आले असून यावर 'हिंदू शेरनी' असा उल्लेख करण्यात आला आहे. 

6/6

मात्र खासदार असूनही त्यांना वाहतुकीच्या नियमांचा विसर पडल्याचं या व्हिडिओत दिसतंय. कारण बुलेटस्वारी करताा त्या हेल्मेट वापरायचं विसरल्यात.