PHOTO: महाबळेश्वरमध्ये ऋषिकेश, उत्तराखंड सारखा थरारक अनुभव; उंच आकाशात भरारी घेत डोंगरावरुन उडण्याचे धाडस

Mahabaleshwar Tourist Places: महाराष्ट्रातील पर्यटकांचे आवडते ठिकाण म्हणजे महाबळेश्वर.  महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य पर्यटकांना मंत्रमुग्ध करते. महाबळेश्वर हे एक हिल स्टेशन आहे. येथे अनेक प्रेक्षणिय स्थळं आहे. यासह आता येणाऱ्या पर्यटकांना साहसी पर्यटनाचा थरार देखील अनुभवता येणार आहे. 

Dec 05, 2024, 10:45 AM IST
1/7

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. उंच आकाशात भरारी घेत  महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य अनुभवण्याचे थरारक अनुभव घेता येणार आहे,   

2/7

महाबळेश्वर हे महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण म्हणून देखील प्रसिद्ध आहे. 

3/7

सह्याद्रीच्या डोंगर रांगामध्ये महाबळेश्वर हे पर्यटन स्थळ वसलेले आहे. येथील निसर्ग सौंदर्य पर्यटकांना मोहित करुन टाकते.   

4/7

 महाबळेश्वरमध्ये येणाऱ्या पर्यटकांना उंच आकाशात उडण्याची संधी मिळणार आहे.   

5/7

महाबळेश्वरमध्ये पर्यटकांना पॅरामोटरिंगचा थरार अनुभवता येणार आहे. 

6/7

 ऋषिकेश, उत्तराखंड सारखा थराराक अनुभव आता महाबळेश्वरमध्ये देखील घेता येणार आहे.     

7/7

केवळ भारतातीलच नाही तर जगभरातील पर्यटक महाबळेश्वरमध्ये फिरण्यासाठी येत असतात.