नीता अंबानी रोज पितात 'हे' ज्यूस, वयाच्या 60 व्या वर्षी दिसतात तरुण

नीता अंबानी यांच्या सौंदर्याची सोशल मीडियावर सतत चर्चा सुरु असते. कामासोबतच त्या आरोग्याची देखील विशेष काळजी घेत असतात.  वयाच्या 60 व्या वर्षीही त्या सौंदर्यामध्ये सुनेला मागे टाकतात. नीता अंबानी कोणत्या फळांचा ज्यूस रोज सेवन करतात. जाणून घ्या सविस्तर 

| Aug 17, 2024, 15:02 PM IST
1/7

गाजर ज्यूस

यामध्ये बीटा कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. ते शरीरात व्हिटॅमिन ए तयार करते. यामुळे दृष्टी सुधारते आणि प्रतिकारशक्ती वाढते. याशिवाय त्वचेचा रंगही सुधारतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असल्यामुळे पचनास मदत होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. 

2/7

पालक ज्यूस

पालकाच्या ज्यूसमध्ये अ, क आणि के जीवनसत्त्वे मोठ्या प्रमाणात असतात. यामध्ये लोह आणि कॅल्शियम देखील असते. यामधील पोषक घटक हाडे मजबूत करतात आणि प्रतिकारशक्ती वाढवतात. त्याचबरोबर त्वचा चांगली बनवतात. 

3/7

सेलेरी ज्यूस

सेलेरी ज्यूसमध्ये कॅलरीज कमी असतात आणि अ, क आणि के जीवनसत्त्वे भरपूर असतात. हे शरीराला हायड्रेट ठेवते. पचनास मदत करते आणि जळजळ कमी करते. हे आरोग्यासाठी चांगले असते. 

4/7

डाळिंब ज्यूस

डाळिंबाच्या ज्यूसमध्ये प्युनिकलागिन सारख्या ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. ज्यामुळे जळजळ कमी होते आणि ह्रदय निरोगी राहते. हे व्हिटॅमिन सी चा देखील एक चांगला स्त्रोत आहे. ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते आणि त्वचा चांगली होते. 

5/7

काकडी ज्यूस

काकडीचा ज्यूस खूप पाणचट असतो पण त्यात के आणि क जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. हा ज्यूस त्वचेसाठी चांगला असतो आणि त्यात भरपूर पाणी असल्यामुळे ते शरीर स्वच्छ करण्यासाठी मदत करते. 

6/7

सफरचंद ज्यूस

सफरचंदाच्या ज्यूसमध्ये व्हिटॅमिन सी आणि ए मोठ्या प्रमाणात असते. यामध्ये मोठ्या प्रमाणात क्वेरसेटिन अँटीऑक्सिडंटही आढळतात. ह्रदयाच्या आरोग्यासाठी हे चांगले असते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवते. 

7/7

आल्याचा ज्यूस

आल्याच्या ज्यूसमध्ये दाहक-विरोधी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. जे जिंजरॉलमुळे असतात. आल्याच्या रसामुळे जळजळ कमी करते. पचनास मदत होते आणि प्रतिकारशक्ती वाढवते.