सोशल मीडियात ट्रेण्ड असलेलं कायरोप्रॅक्टर कसं बनायच? किती मिळतो पगार?

शरीराच्या मज्जासंस्था आणि हाडांच्या प्रणालीमध्ये उद्भवणार्या विकारांवर हा एक प्रकारचा गैर-ऑपरेटिव्ह उपचार आहे.

| Sep 25, 2024, 15:30 PM IST

Chiropractor Career Details: शरीराच्या मज्जासंस्था आणि हाडांच्या प्रणालीमध्ये उद्भवणार्या विकारांवर हा एक प्रकारचा गैर-ऑपरेटिव्ह उपचार आहे.

1/7

सोशल मीडियात ट्रेण्ड असलेलं कायरोप्रॅक्टर कसं बनायच? किती मिळतो पगार?

How to Become chiropractor Education Skills Salary Career Marathi News

Chiropractor Career Details: तुम्ही सोशल मीडियावर असाल तर तज्ज्ञांकडून शरीराची हाडे वाजवून आजार बरे केल्याचे तुम्ही पाहिले असेल. असे अनेक व्हिडीओ सध्या ट्रेण्डवर आहेत. याला कायरोप्रॅक्टिक असं म्हणतात. कायरोप्रॅक्टिक म्हणजे काय? ते होण्यासाठी काय शिक्षण लागत? किती पगार मिळतो? सर्वकाही जाणून घेऊया.

2/7

दबाव लागू करण्याची प्रक्रिया

How to Become chiropractor Education Skills Salary Career Marathi News

कायरोप्रॅक्टिक उपचारांमध्ये, कायरोप्रॅक्टर थेरपिस्ट कोणत्याही शस्त्रक्रिया किंवा औषधाशिवाय हाडांच्या प्रणालीला  योग्य स्वरूपात आणतात. यात हातांच्या मदतीने पाठीच्या कण्यावर, किंवा संबंधित भागावर दबाव आणला जातो. पुढे शरीर स्वतःच वेदना बरे करते.

3/7

कायरोप्रॅक्टर कौशल्ये

How to Become chiropractor Education Skills Salary Career Marathi News

कायरोप्रॅक्टरच्या कामासाठी जबाबदारी, प्रामाणिकपणा, आत्मविश्वास आणि विशिष्ट कौशल्ये आवश्यक असतात. यासोबतच शरीरातील वेदनांचा नेमका भाग ओळखणे, आधुनिक उपचार तंत्रांचा वापर करणे, चिकाटी आणि संयम,आंतरवैयक्तिक कौशल्ये,टाइम मॅनेजमेंट स्किल्स, टीमवर्किंग कौशल्ये असणं आवश्यक आहे.

4/7

कोणत्या आजारात मदत

How to Become chiropractor Education Skills Salary Career Marathi News

एकदा परवाना मिळाल्यावर, कायरोप्रॅक्टर सरकारी आणि खासगी दोन्ही क्षेत्रात काम करू शकतात.पाठ, मान आणि खांद्याच्या दुखण्यापासून ते दमा, कार्पल टनल सिंड्रोम, फायब्रोमायल्जिया आणि डोकेदुखीपर्यंतच्या दुखण्यात यांची मदत होते. 

5/7

कायरोप्रॅक्टरसाठी शिक्षण

How to Become chiropractor Education Skills Salary Career Marathi News

डॉक्टर ऑफ कायरोप्रॅक्टिक डिग्री प्रोग्राममध्ये 4,200 तासांचा वर्ग अभ्यास, प्रयोगशाळा कार्य आणि क्लिनिकल अनुभव समाविष्ट आहे. यामध्ये शरीरशास्त्र, मानसशास्त्र, सार्वजनिक आरोग्य, सूक्ष्मजीवशास्त्र, पॅथॉलॉजी आणि बायोकेमिस्ट्रीचे शिक्षण दिले जाते.

6/7

पात्रता

How to Become chiropractor Education Skills Salary Career Marathi News

भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र या विषयांमध्ये बारावी आणि बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे. IELTS, TOEFL या प्रवेश परीक्षा द्याव्या लागतात.

7/7

करिअर स्कोप

How to Become chiropractor Education Skills Salary Career Marathi News

सरकारी हॉस्पिटल, क्लिनिक आणि आरोग्य विभाग, नर्सिंग होम वृद्धाश्रम, मिलिटरी हॉस्पिटल येथे नोकरी मिळते. कायरोप्रॅक्टरला सुरुवातीचा पगार 20 ते 25 हजार रुपये महिना इतका मिळतो.