New Traffic Rules: आता 100-200 नाही चालणार! 2 व्हिलरवर असताना 'या' चुका केल्यास 1000 रुपये दंड

New Traffic Rules In Maharashtra: राज्यामधील वाहतुकीच्या नियमांमध्ये केलेल्या बदलांनुसार अधिक दंड आकारण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नेमका कशासाठी किती दंड असणार आहे जाणून घेऊयात...

| Dec 02, 2024, 09:40 AM IST
1/9

trafficpolicerule

अनेक गुन्ह्यांसाठी दंडाची रक्कम थेट दुप्पट करण्यात आलेली आहे. नेमकं काय आहे या नव्या नियमांमध्ये पाहूयात...

2/9

trafficpolicerule

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांकडून आकारण्यात येणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी दंडाची रक्कम वाढवण्यात आल्यानंतर या वाढीव दराने दंड आकारणी सुरु करण्यात आली आहे.

3/9

trafficpolicerule

दंडाची रक्कम वाढवल्यानंतर नव्या नियमानुसार गाडी चालविणारा चालक आणि मागे बसलेला सहप्रवासी या दोघांकडे हेल्मेट नसल्यास एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.  

4/9

trafficpolicerule

महामार्गावर वेग मर्यादा ओलांडून वेगाने वाहन चालवताना आढळल्यास दुचाकीस्वारांना एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.   

5/9

trafficpolicerule

आरटीओ कार्यालयात नोंदणी नसताना वाहन चालविल्यास तसेच निष्काळजीपणे ड्राइव्हिंग करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे.   

6/9

trafficpolicerule

वाहतूक विभागांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. इन्शुरन्स नसताना वाहन चालविल्यास चालक आणि मालक या दोघांनाही यापुढे दंड भरावा लागणार आहे.  

7/9

trafficpolicerule

रस्ते अपघातात होणारं मृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी या कठोर नियमांची अंमलबजावणी केली जाणार आहे. विना पात्रता वाहन चालवणे, अतिवेगात वाहन चालवणेही कायद्याने गुन्हा आहे.   

8/9

trafficpolicerule

वाहन फिट नसताना चालवणे तसेच वाहनात बेकायदा बदल करणाऱ्यांनाही एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.  

9/9

trafficpolicerule

सध्या तरी केवळ सातारा जिल्ह्यात या नव्या नियमांनुसार दंडवसुलीला सुरुवात झाली आहे. सध्या केवळ महामार्गावर दोघांनाही हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे दोघेजण विनाहेल्मेट दुचाकीने महामार्गावरुन जाताना दिसल्यास संबंधितांना एक हजारांचा भुर्दंड बसणार आहे. (सर्व फोटो प्रातिनिधिक आहेत. सौजन्य - पीटीआय तसेच रॉयटर्सवरुन साभार)