महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवे! मुंबई ते गोवा अंतर फक्त 6 तासात पार होणार

महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवे तयार होत आहे. या नव्या सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवेमुळे मुंबई ते गोवा अंतर फक्त 6 तासात पार होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास जलद आणि सुखद होणार आहे. जाणून घेऊया कोकण एक्स्प्रेसवेबाबत.

| Sep 13, 2024, 00:07 AM IST

Kokan Expressway Mumbai Goa : महाराष्ट्रात नवा सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवे तयार होत आहे. या नव्या सुपरफास्ट कोकण एक्स्प्रेसवेमुळे मुंबई ते गोवा अंतर फक्त 6 तासात पार होणार आहे. यामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून प्रवास जलद आणि सुखद होणार आहे. जाणून घेऊया कोकण एक्स्प्रेसवेबाबत.

1/7

कोकणात तसेत गोव्याला जाण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्ग हा एकच पर्याय आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे.  कोकण एक्स्प्रेसवे हा  मुंबई गोवा महामार्गासाठी पर्यायी मार्ग ठरणार आहे. 

2/7

एमएसआरडीमार्फत कोकण एक्स्प्रेसवे  उभारला जाणार आहे.  871 छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा असणार आहेत. 

3/7

375.947 किमी लांबीचा  कोकण एक्स्प्रेसवे कोकणातून जाणार आहे. 17 तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. संपूर्ण मार्गावर 14 इंटरचेंज असणार आहेत.   

4/7

मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 12 ते 15 तास लागतात.

5/7

कोकण एक्स्प्रेसवेसाठी 68 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.  मुंबई ते गोवा अंतर 523 किमी आहे.  

6/7

कोकण एक्स्प्रेसवे  प्रकल्पासाठी सुमारे  3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे. 

7/7

 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) मुंबई आणि गोवा दरम्यान नवीन महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोकण एक्स्प्रेसवे या नावाने हा महामार्ग ओळखला जाणार आहे.