फक्त 50 हजार रुपये पाहिजेत; 'या' सुंदर देशात पाऊल टाकताच भारतीय एका मिनिटांत बनतात करोडपती

जाणून घेऊया जगातूल सुंदर आणि स्वत देश कोणता आहे. 

वनिता कांबळे | Sep 12, 2024, 23:30 PM IST

Laos Facts : तुम्ही कोट्यधीश असाल किंवा नसाल, पण आपल्याजवळ भरपूर पैसे असावेत आपण श्रीमंत व्हावं असं सगळ्यांनाच वाटत असतं. मध्यमवर्गीय लोकांना कोट्यधीश होण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतात आणि बराच काळ धीर धरावा लागतो. मात्र तुम्हाला फार पैसे न कमावता कोट्यधीश व्हायचं असेल तर जगातील एक देश तुमची वाट पाहतोय. या देशात आल्यानंतर तुम्हाला कोट्यधीश असल्याची अनुभूती मिळते.  या देशाचं नाव आहे लाओस.

1/7

लाओस हा आग्नेय आशियाई देश असून तो अतिशय सुंदर आहे. लाओसचं खरं नाव 'लाओ पीपल्स डेमोक्रॅटिक रिपब्लिक' आहे. या देशाची राजधानी वियांग चॅन आहे. या देशाचे भारताशी खूप जुने संबंध आहेत. इथं राहणारे लोकही स्वत:ला भारतीय समजतात.

2/7

इथं राहणारे बहुतांश लोक तरुण आहेत. लाओसची 70 टक्के लोकसंख्या 30 वर्षांखालील असल्याचं सांगण्यात येतं.  याशिवाय आग्नेय आशियातील सर्वोत्तम कॉफी या देशात पिकवली जाते. इतकंच नाही तर जगातील सर्वाधिक अफू पिकवणाऱ्या देशांमध्येही लाओसचं नाव घेतलं जातं.   

3/7

लाओस हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बुटक्या लोकांचा देश आहे. इथल्या लोकांची सरासरी उंची 5 फूट आहे.  

4/7

इतकंच नाही तर या देशातील भारतीयांची गणना श्रीमंत लोकांमध्ये केली जाते.

5/7

म्हणजेच 50 हजार रुपये असलेला कोणताही भारतीय तिथल्या करोडपतीसारखा असतो.

6/7

भारताचा 1 रुपया इथं 252 लाओ फनेलइतका आहे. म्हणजे तुमच्याकडे 50 हजार रुपये असतील तर ते 1 कोटी 26 लाख 492 लाओ कीप इतकं आहे.

7/7

लाओसमध्ये लाओ कीप नावाचं चलन आहे. जे अत्यंत स्वस्त आहे.