Porsche कंपनीची नवी कार भारतात लाँच; आत्ता बुकिंग केली तर वर्षाअखेरीस डिलीव्हरी मिळणार

Porsche 911 Carrera  कारचे बेस्ट फिचर्स जाणून घेऊया. 

Jun 02, 2024, 20:56 PM IST

Porsche 911 Carrera : जर्मनीची आघाडीची लक्झरी स्पोर्ट्स कार उत्पादक कंपनी Porsche ने भारतात नव्या कार लाँच केल्या आहेत. हायब्रीड श्रेणीतील या कारमध्ये जबरदस्त फिचर्स देण्यात आले आहेत.

1/7

Porsche ने भारतात दोन नव्या कार लाँच केल्या आहेत. Porsche 911 Carrera रेंजमधील या कार आहेत. 

2/7

पोर्शेच्या या नव्या कारची स्टार्टिंग प्राईज  1.99 कोटी रुपये तर Carrera 4 GTS मॉडेलची किंमत 2.75 कोटी रुपये इतकी आहे.   

3/7

कारमध्ये  3.6 लिटर क्षमतेचे फ्लॅट-सिक्स इंजिन देण्यात आले आहे. 478bhp ची मजबूत पॉवर आणि 570Nm टॉर्क जनरेट करते. 

4/7

कारचे इंजिन अतिशय पॉवरफुल आहे. तसेच कारचा आकर्षक लुक लेक्ष वेधून घेत आहे. 

5/7

या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे  स्पीड दरम्यान डिस्प्लेवर टायरच्या तापमानाची माहिती दिसणार आहे. स्पोर्ट रिस्पॉन्स बटण आणि लॅप टाइम रेकॉर्डिंगसारख्या सुविधाही या कारमध्ये देण्यात आल्या आहेत. 

6/7

नवीन टी-हायब्रिड पॉवरट्रेनने सुसज्ज असलेल्या या कारमध्ये 8-स्पीड पीडीके ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअरबॉक्ससह देण्यात आला आहे.  

7/7

 Porsche 911 Carrera चे बुकिंग सुरु झाले असून वर्षाअखेरीस या कारची डिलीव्हरी मिळणार आहे.