Weekend Releases: यंदाचा वीकेंड फुल टू धमाल! OTT वरील 'या' 5 वेब सीरिज लावणार मनोरंजनाचा तडका

Aug 04, 2023, 19:57 PM IST
1/5

हंट फॉर वीरप्पन (Veerappan, Netflix)

'द हंट फॉर वीरप्पन' 4 ऑगस्ट 2023 पासून नेटफ्लिक्सवर सिलीज होणार आहे. या सिरीजमध्ये त्याच्या लोकांच्या न ऐकलेल्या गोष्टी ऐकायला मिळतील. त्याचबरोबर विरप्पनला कशा प्रकारे पकडलं गेलं, त्यावर देखील भाष्य करण्यात आलं आहे.

2/5

धूमम (Dhoomam, amazon prime)

'धूमम' ही सिरीज 4 ऑगस्ट 2023 रोजी अॅमेझॉन प्राईम व्हिडीओवर रिलीज होत आहे. त्याची कहाणी अविनाश नावाच्या माणसाची आहे जो आपली मार्केटिंगची नोकरी सोडण्याचा निर्णय घेतो. त्यानंतर काय काय होतं, पाहा...

3/5

पोर थोज़िल (Por Thozhil, SonyLiv)

एक पोलीस कर्मचारी आणि अनुभवी कायदातज्ज्ञ यांच्या कथेवर आधारित 'पोर थोझिल' हा रोमांचकारी क्राईम थ्रिलर SonyLiv वर पहायला मिळेल.

4/5

गार्डियंस ऑफ द गैलेक्सी वॉल्यूम 3 (Guardians of the Galaxy Vol. 3, disney plus hotstar)

गार्डियन्स ऑफ द गॅलेक्सी व्हॉल्यूम 3 मध्ये स्टार लॉर्ड आणि गमोराची प्रेमकथा दाखवण्यात आलीये. सोबत रॉकेटची मागील कथा आणि विश्वाचे संरक्षण यावर देखील दृष्यांकन करण्यात आलंय.

5/5

दया (Dayya, disney plus hotstar)

दया ही तेलुगु मर्डर मिस्ट्री सिरीज आहे. या मालिकेची कथा कविता नायडू नावाच्या बेपत्ता पत्रकाराभोवती फिरते. पाहण्यात अधिकच रोमांचक अशी ही सिरीज आहे.