PHOTO : ना कपूर, ना बच्चन, हे भारतातील सर्वात श्रीमंत फिल्मी कुटुंब, 4 सुपरस्टारसह हजारो कोटींच्या संपत्तीचं मालक

India's Richest Filmy Family : चित्रपटसृष्टी आणि श्रीमंत कुटुंब म्हटलं की, आपल्या डोळ्यासमोर बच्चन किंवा कपूर कुटुंब येत. पृथ्वीराज कपूर यांच्या मुलांनंतर त्यांची नातवंडे बॉलिवूडवर राज्य करताना दिसत आहे. तर अमिताभ बच्चन यांचा वारसा त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन आणि आता त्यांचा नातू अगस्त्य नंदा पुढे नेत आहेत. पण तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, बच्चन किंवा कपूर कुटुंब हे सर्वात श्रीमंत नाही तर दक्षिण चित्रपटातील हे कुटुंब सर्वाधिक श्रीमंत आहे. 

Dec 09, 2023, 22:03 PM IST
1/9

चित्रपटसृष्टी असो वा व्यवसाय, भारतात प्रसिद्ध घराण्यांच्या वारसांचे वर्चस्व पाहिला मिळतं. आज प्रसिद्ध अभिनेते आणि निर्मात्यांची मुलं त्यांचा समृद्ध वारसा चालवत आहेत. बॉलीवूडसोबतच साऊथ सिनेसृष्टीतही चित्रपट कुटुंबांचा दबदबा आपण कायम पाहिला आहे. पण सर्वात श्रीमंत चित्रपट कुटुंबाचा विचार केला तर तेलुगू चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध कुटुंब अव्वल स्थानी कोण तुम्हाला माहिती आहे का?

2/9

या प्रसिद्ध कुटुंबाची एकूण संपत्ती कपूर आणि अक्किनेनी यांच्या एकूण संपत्तीपेक्षाही अधिक आहे. तर या कुटुंबात चार सुपरस्टार आहेत. 

3/9

आम्ही बोलत आहोत तेलुगू सिनेसृष्टीतील मेगास्टार चिरंजीवीच्या कुटुंबाबद्दल. अल्लू-कोनिडेला कुटुंब हे देशातील सर्वात श्रीमंत चित्रपट कुटुंब आहे.   

4/9

अल्लू-कोनिडेला कुटुंबाला मेगा फॅमिली देखील म्हटलं जातं. जे तेलुगु चित्रपट उद्योगावर राज्य करताना दिसतं. भारतीय चित्रपटसृष्टीत या कुटुंबाचं मोलाचं योगदान मानलं जातं.   

5/9

तेलुगु सिनेमातील प्रसिद्ध अभिनेता, विनोदकार आणि चित्रपट निर्माता अल्लू रामलिंगय्या यांनी 1950 मध्ये या मेगा फॅमिलीचा पाया रचला.   

6/9

अल्लू-कोनिडेला कुटुंबाने तेलगू चित्रपटसृष्टीत त्यांच्या उत्तराधिकार्‍यांच्या माध्यमातून खोलवर छाप पाडली आहे. अल्लू रामलिंगय्या यांच्या चार मुलांपैकी एक असलेले अरविंद प्रसिद्ध चित्रपट निर्माते आहेत. अभिनेत्याची मुलगी सुरेखा हिचं लग्न तेलुगू सुपरस्टार चिरंजीवीसोबत झालंय.  

7/9

अल्लू रामलिंगय्या यांच्या मुलांनी तेलुगू चित्रपटसृष्टीला अनेक स्टार्स दिले आहेत. राम चरण, अल्लू अर्जुन आणि नागेंद्र बाबू, वरुण तेज या कुटुंबातील स्टार आहेत. 

8/9

चित्रपटसृष्टीत चिरंजीवीसह राम चरण, अल्लू अर्जुन आणि अल्लू अरविंद यांचं मोठं योगदान आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या कुटुंबातील महत्त्वाच्या सदस्यांची संपत्ती सुमारे 6 हजार कोटी एवढी आहे. 

9/9

गीता आर्ट्स, अंजना प्रॉडक्शन, पवन कल्याण क्रिएटिव्ह वर्क्स, कोनिडेला प्रॉडक्शन कंपनी आणि अल्लू स्टुडिओ या त्यांच्या पाच फिल्म प्रोडक्शन हाऊसने अल्लू-कोनिडेला कुटुंबाच्या संपत्तीत भर दिली आहे. या कुटुंबाने भारतीय चित्रपटसृष्टीला 4 सुपरस्टार अभिनेते दिले आहेत.