Alia Bhatt नंतर सासू नीतू कपूर यांनी खरेदी केला अलिशान फ्लॅट, किंमत कोट्यवधींच्या घरात

Neetu Kapoor and alia bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट कायम चर्चेत असते. मात्र, आता आलिया नाही तर तिची सासू नीतू कपूरही चर्चेत आहेत. नुकताच नीतू कपूर यांनी मुंबईत एक नवीन घर खरेदी केलं आहे. ज्या घराची सध्या खूप चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, आलिया भट्टने काही महिन्यांपूर्वीच एक नवीन प्रॉपर्टी खरेदी केली होती आणि आता तिच्या सासू नीतू कपूर यांनी घर विकत घेतलं आहे.   

Diksha Patil | May 18, 2023, 19:39 PM IST
1/7

वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील

Neetu Kapoor Bought Property

'हिंदुस्तान टाइम्स'च्या रिपोर्ट्सनुसार, नीतू कपूर यांनी मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील बिझनेस एरियामध्ये नवीन प्रॉपर्टी खरेदी केली आहे. हा फ्लॅट एक असून 4 BHK अपार्टमेंट आहे. 

2/7

नीतू कपूर यांच्या या फ्लॅटची किंमत?

Neetu Kapoor Bought Property

नीतू कपूर यांनी खरेदी केलेल्या या आलिशान फ्लॅटची  किंमत 17.4 कोटी रुपये असल्याचे म्हटले जात आहे. सनटेक रियल्टी अल्ट्रा-लग्‍जरी प्रोजेक्ट सिग्निया आइल या 19 फ्लोअरच्या असलेल्या प्रोजेक्टमध्ये 17 फ्लॉअरवर हा फ्लॅट खरेदी केला आहे. 

3/7

जुगजुग जिओ चित्रपटातून केलं पुनरागमन

Neetu Kapoor Bought Property

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या जुगजुग जिओ या चित्रपटातून नीतू कपूर यांनी अभिनय क्षेत्रात पुनरागमन केलं आहे.   

4/7

फ्लॅटसाठी भरला इतका स्टॅम्प ड्युटी

Neetu Kapoor Bought Property

स्टॅम्‍प ड्यूटी करण्यासाठी नीतू कपूर यांनी 1.04 कोटी रुपये देत 10 मे रोजी हा फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट 3,387 चौरस फूट पसरलेला असून त्यासाठी तीन कार पार्किंगही आहेत.

5/7

आलियानंही घेतला याच परिसरात प्रॉपर्टी

Neetu Kapoor Bought Property

आलियानं महिनाभरापूर्वीच वांद्रे परिसरात घर खरेदी केलं आहे. फक्त हे एक नाही तर आलियानं अशी अनेक घर त्या परिसरात खरेदी केली आहेत. 

6/7

आलियानं खरेदी केलेल्या पहिल्या फ्लॅटची किंमत

Neetu Kapoor Bought Property

आलियानं खरेदी केलेल्या पहिल्या फ्लॅटची किंमत ही 37.80 कोटी रुपये आहे. तर हा फ्लॅट 2,497 स्क्वेअर फूट एरियाचा आहे.

7/7

याशिवाय आलियानं घेतल्या इतक्या प्रॉपर्टी

Neetu Kapoor Bought Property

आलियाने तिची बहीण शाहीन भट्ट हिला 7.68 कोटी रुपयांचे दोन अपार्टमेंट गिफ्ट केल्याचे म्हटले जाते आहे. हे फ्लॅट्स जुहू परिसरात आहेत. (All Photo Credit : Alia Bhatt/ Neetu Kapoor Instagram)