NEET घोटाळ्याचे धागेदोरे महाराष्ट्रापर्यंत; काय आहे NEET घोटाळ्याचा 'लातूर पॅटर्न'?

NEET परीक्षेतल्या घोटाळ्यावरून देशभरात रणकंदन सुरू आहे. आता NEET घोटाळ्याचं लातूर कनेक्शन उघड झालंय. याप्रकरणी लातूरमधून २ शिक्षकांना ताब्यात घेण्यात आलंय. घोटाळ्याचा हा लातूर पॅटर्न नेमका काय आहे? पाहुयात,

| Jun 23, 2024, 23:03 PM IST

NEET UG 2024 scam: देशभरात चर्चेत असलेल्या नीट घोटाळ्याचं महाराष्ट्र कनेक्शन आता उघड झालंय. NEET पेपरफुटीचे धागेदोरे थेट लातूरपर्यंत पोहोचलेत. नांदेड ATS पथकानं लातूरच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलंय. नीट घोटाळ्यावरून देशभरात रणकंदन सुरू असताना त्याचे धागेदोरे महाराष्ट्रात पोहोचल्यानं खळबळ उडालीय. नीट घोटाळ्यात जे कुणी दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी केलीय. 

1/8

बिहारमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याच्या आधारावर CBI नवीन गुन्हा दाखल करणार आहे. संपूर्ण प्रकरण आपल्या हातात घेऊन CBI कडून पेपरफुटीची चौकशी केली जाणार आहे. त्यातच याचं लातूर कनेक्शन समोर आल्यानंतर आता पोलीस तपासातून काय समोर येतं, 

2/8

NEET पेपरफुटी प्रकरणाची आता CBI चौकशी करण्यात येणार आहे.

3/8

NEET प्रवेश परीक्षेच्या निकालावरून देशभर वादाचं लोण पसरलंय. काही पालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन जनहित याचिका दाखल झाली आहे. 

4/8

लातूरच्या अंबाजोगाई रोड भागात राहणारे जलील पठाण कातपूरच्या जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक आहेत. 

5/8

संजय जाधव  सध्या सोलापूरच्या टाकळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत

6/8

रात्री उशिरा ATSनं छापेमारी करत आवळल्या मुसक्या संजय जाधव हे मूळचे चाकूर तालुक्यातील बोथी तांडा इथले रहिवासी आहेत. 

7/8

दोघेही पीएचडीधारक शिक्षक, लातूरमध्ये खासगी क्लासेस चालवतात

8/8

संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखाँ पठाण हे दोघे ताब्यात.