चार महिन्याच्या लेकराला घेवून महिला आमदार अधिवेशनात; ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था पाहून डोळ्यात पाणी

 ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था पाहून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे (NCP MLA Saroj Ahire) यांनी नाराजी व्यक्त केली. 

Feb 27, 2023, 16:57 PM IST

Maharashtra Budget Session 2023-2024:  शिंदे (Eknash Shinde) आणि फडणवीस (Devendra Fadnavis ) सरकारचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन (Mumbai News) आजपासून सुरु झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे (NCP MLA Saroj Ahire) आपल्या चार महिन्याच्या बाळाला घेवून विधिमंडळात दाखल झाल्या होत्या. मात्र,  ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था पाहून त्यांच्या डोळ्यात पाणी आले. 

1/6

नागपूर येथे झालेल्या अधिवेशनात आमदार सरोज अहिरे लहान बाळाला घेऊन आल्या होत्या. तेव्हा त्यांचे बाळ फक्त अडीच महिन्यांचे होते. 

2/6

आई आणि आमदार अशा दोन्ही जबाबदाऱ्या  राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे पार पाडत आहेत. मात्र, हिरकणी कक्षाची अवस्था पाहता बाळाला ठेवायचे कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

3/6

बाळ आजारी असताना त्या आपलं कर्तव्य बजावण्यासाठी अधिवेशनाला आल्या. पण,  ‘हिरकणी कक्षा’ची दुरावस्था पाहून त्या नाराज झाल्या. हिरकणी कक्षात सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेय. या धुळीत बाळाला कसे ठेवयाचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

4/6

 राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे या देवळाली आमदार आहेत. 30 सप्टेंबर 2022 रोजी त्यांना मुलगा झाला.

5/6

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांची भेट घेतली.   

6/6

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी राज्यातील सर्व कार्यालयांत बाळांना घेऊन येणाऱ्या महिलांसाठी खास व्यवस्था करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी केली आहे.