कधी? कुठे भूकंप, चक्रीवादळ, त्सुनामी, ज्वालामुखी येणार ते आधीच कळणार; भारत लाँच करणार जगातील सर्वात पावरफुल सॅटेलाईट

ISRO च्या या खास उपग्रहामुळे नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याची सूचना आधीच मिळणार आहे. 

| Nov 11, 2024, 16:48 PM IST

NASA ISRO​ NISAR : भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यासारख्या नैसर्गिक आपत्तींच्या धोक्याची सूचना आधीच मिळणार आहे. जगातील सर्वात पावरफुल सॅटेलाईट भारत लाँच करणार आहे.  भारताच्या इस्रो आणि अमेरिकेतल्या नासाने मिळून निसार नावाचा उपग्रह विकसीत करत आहे. येत्या काही महिन्यात हा उपग्रह अवकाशात झेपवणार आहे. 

1/7

 भारतीय अंतराळ स्थंस्था इस्रो आणि अमेरिकेची अंतराळ संस्था नासा एकत्र एका मोठ्या मोहिमेवर काम करत आहे. लवकरच जगातील पावरफुल सॅटेलाईट लाँच केला जाणार आहे. हा उपग्रह नैसर्गिक धोक्यांची आधीच सूचना देणार आहे.   

2/7

 2025 या वर्षाच्या सुरुवातीला हा उपग्रह लाँच केला जाण्याची शक्यता आहे. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या लॉन्च पॅडवरून GSLV-MK2 रॉकेटद्वारे हा सॅटेलाईट लाँच केला जाणार आहे. 

3/7

NASA सोबत, भारतीय शास्त्रज्ञांना देखील NISAR उपग्रह मोहिमेचा डेटा मिळणार आहे. निसार उपग्रह तयार करण्याचे बजेट चांद्रयान 3 पेक्षा जास्त आहे. यासाठी 1.5 अब्ज डॉलर्सचे बजेट देण्यात आले.   

4/7

हा उपग्रह 2600 किलो वजनाचा आहे. यातील रडार इमेजिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक प्रकारची माहिती मिळणार आहे. 

5/7

निसार उपग्रह भूकंप, त्सुनामी, ज्वालामुखी आणि भूस्खलन यांसारख्या नैसर्गिक आपत्तींची माहिती देणार तसेच. नैसर्गिक आपत्ती कधी कुठे येवू शकतात याचा अंदाज देखील वर्तवणार आहेत.   

6/7

या उपग्रहाद्वाच्या मदतीने पृथ्वीच्या जमीन आणि बर्फांच्छादीत प्रदेशातल्या वातावरण बदलांचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. 

7/7

 NASA  आणि ISRO मिळून सिंथेटिक अपर्चर रडार (NISAR) अर्थात निसार नावाचा उपग्रह विकसीत करत आहे.