ना डिझेल, ना वीज; आता 'पाण्या'वर धावणार ट्रेन! मार्ग, स्पीड सर्वकाही जाणून घ्या!
पुढील महिन्यापासून भारतात धावणाऱ्या हायड्रोजन ट्रेनबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
India First Hydrogen Train: पुढील महिन्यापासून भारतात धावणाऱ्या हायड्रोजन ट्रेनबद्दल आपण माहिती जाणून घेऊया.
1/9
ना डिझेल, ना वीज; आता 'पाण्या'वर धावणार ट्रेन! मार्ग, स्पीड सर्वकाही जाणून घ्या!
India First Hydrogen Train: कोळशाचा धूर सोडणारी झुकझुक गाडी तुम्ही सिनेमात पाहिली असेल. वेळेनुसार तिचा वेग वाढला आणि तिच्यात पूर्णपणे बदलही झाला. आज भारतीय रेल्वे अपडेट झाली आहे. आता रेल्वे गाड्या डिझेल आणि विजेवर धावताना दिसतात. वंदे भारत, शताब्दी, तेजस या लक्झरी ट्रेन रुळांवर धाऊ लागल्या आहेत. दुसरीकडे बुलेट ट्रेनचे रॉकेटच्या वेगाने धावताना आपण पाहू शकतोय.
2/9
पाण्यावर धावणाऱ्या ट्रेनची प्रतीक्षा संपली
3/9
पाण्यावर धावणारी भारतातील पहिली ट्रेन
4/9
दर तासाला 40,000 लीटर पाणी
पुढील महिन्यापासून भारतात धावणाऱ्या हायड्रोजन ट्रेनबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. या ट्रेनचा मार्ग, अंतर आणि वेग सर्व काही ठरलेले आहे. डिसेंबर 2024 मध्ये ही या ट्रेनची चाचणी करण्यात येणार आहे. ही ट्रेन हायड्रोजन इंधनावर धावणार आहे. यासाठी ट्रेनला दर तासाला 40,000 लीटर पाणी लागेल. त्यासाठी मोठा जलसाठा निर्माण केला जाणार आहे.
5/9
देशात 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची योजना
'पाण्यावर' धावणाऱ्या हायड्रोजन ट्रेनची हायड्रोजन इंधन सेल आणि पायाभूत सुविधांची चाचणी यशस्वी झाली आहे. सेल आणि हायड्रोजन प्लांटच्या डिझाइनला मान्यता देण्यात आली आहे. देशभरात 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याची तयारी सुरू आहे. रेल्वेचे पीआरओ दिलीप कुमार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. हायड्रोजन ट्रेनची किंमत सुमारे 80 कोटी रुपये आहे.
6/9
हायड्रोजन ट्रेन नेमकी कशी धावणार?
7/9
वेगवेगळ्या मार्गांवर 35 हायड्रोजन ट्रेन
ही ट्रेन 2024-25 मध्ये सुरू होऊ शकते असे मानले जात आहे. रेल्वेने वेगवेगळ्या मार्गांवर 35 हायड्रोजन ट्रेन चालवण्याच्या तयारी केली आहे. हायड्रोजन ट्रेन हायड्रोजन इंधनावर चालते. या ट्रेनमध्ये डिझेल इंजिनांऐवजी हायड्रोजन इंधन असते. यामुळे कार्बन डायऑक्साइड, नायट्रोजन किंवा पार्टिक्युलेट पदार्थ उत्सर्जित केले जात नाहीत. या गाड्या चालवून प्रदूषणावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
8/9
हायड्रोजन ट्रेनमध्ये काय खास?
हायड्रोजन इंधन सेल्सच्या मदतीने या ट्रेनमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे रूपांतर करून वीज तयार केली जाते. ही वीज ट्रेन चालवण्यासाठी वापरली जाते. हायड्रोजन वायूवर चालणारी इंजिने धुराऐवजी वाफ आणि पाणी उत्सर्जित करतील. या ट्रेनमध्ये डिझेल इंजिनपेक्षा 60 टक्के कमी आवाज असेल. असे असले तरी तिचा वेग आणि प्रवासी वाहून नेण्याची क्षमता देखील डिझेल ट्रेनइतकी असेल.
9/9