Kuno National Park : कुनो नॅशनल पार्कमध्ये चार बछड्यांचा जन्म

 नामिबियातून भारतात आणलेल्या एका मादी चित्ताने चार बछड्यांना जन्म दिलाय.

Mar 30, 2023, 16:04 PM IST

कुनो नॅशनल पार्कमधून एक चांगली बातमी आली आहे. नामिबियातून भारतात आणलेल्या एका मादी चित्ताने चार बछड्यांना जन्म दिला आहे. सियाया तीन वर्षांची आहे. या चित्तीणीला नामिबियामधून पहिल्या तुकडीतून भारतात आणलं होतं. 

1/5

कुनो नॅशनल पार्कमधून एक चांगली बातमी आली आहे. नामिबियातून भारतात आणलेल्या एका मादी चित्ताने चार बछड्यांना जन्म दिला आहे. 

2/5

मध्य प्रदेशातल्या कुनो नॅशनल पार्कमध्ये सियाया या मादी चित्त्याने चार बछड्यांना जन्म दिला आहे. सियाया तीन वर्षांची आहे. या चित्तीणीला नामिबियामधून पहिल्या तुकडीतून भारतात आणले होते. 

3/5

नामिबियामधून आणण्यात आलेल्या चित्त्यापैकी ‘साशा’ च्या मृत्यूने हळहळ व्यक्त करत असताना याच कुनो नॅशनल पार्कमधून एक चांगली बातमी आली आहे. कुनो नॅशनल पार्कमध्ये मादी चित्त्याने चार बछड्यांचा जन्म दिलाय.

4/5

 गेल्या वर्षी नामिबियातून आठ चित्ते भारतात आणण्यात आले होते. सिया या मातेच्या चितेने बुधवारी चार पिल्लांना जन्म दिला. चित्त्यांचा प्रेग्नंट असण्याचा काळ साधारण 90 ते 93 दिवस असतो. तो पूर्ण होताच ‘सियाया’ ने बछड्यांना जन्म दिला. 

5/5

या चित्त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला अर्थात 17 सप्टेंबर रोजी नामिबियामधून मध्य प्रदेशमधील कुनो नॅशनल पार्कमध्ये आणण्यात आले होते. डिसेंबर महिन्यात सियाया, साशा आणि आशा यांना मोठे कुंपण असलेल्या जागेत ठेवून त्यांचे नर चित्त्यांसोबत मेटिंग घडवून आणण्यात आले होते.