Nagpanchami 2024: नागपंचमीच्या दिवशी उकडलेले पदार्थ का खाल्ले जातात? वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल

नागपंचमीच्या दिवशी उकडलेले पदार्थ का खाल्ले जातात? वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल 

| Aug 07, 2024, 13:52 PM IST

Nagpanchami 2024: नागपंचमीच्या दिवशी उकडलेले पदार्थ का खाल्ले जातात? वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल 

1/7

Nagpanchami 2024: नागपंचमीच्या दिवशी उकडलेले पदार्थ का खाल्ले जातात? वैज्ञानिक कारण वाचून आश्चर्य वाटेल

 Nagpanchami 2024 Why not use tawa and kadai on nagpanchmi and reason behind eating only boiled food

नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुल्क पक्षात पंचमी तिथीला साजरा केला जातो. यंदा 9 ऑगस्ट रोजी नागपंचमी हा सण येत आहे. हिंदू धर्मात नागपंचमीला खूप महत्त्व आहे. त्याचबरोबर यामागे शास्त्र असल्याचेही सांगण्यात येते. नागपंचमीला उकडलेले पदार्थ खावेत, असं सांगण्यात येत. तर त्यामागचं वैज्ञानिक कारण आपण समजून घेऊयात. 

2/7

 Nagpanchami 2024 Why not use tawa and kadai on nagpanchmi and reason behind eating only boiled food

नागपंचमी हा सणाचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी काहीही चिरू-कापू नये, तळू नये, चुलीवर तवा ठेवू नये, भाजू नये, जमीन खणू नये, असं म्हटलं जातं. त्याचबरोबर उकडलेले पदार्थ खावेत, असंही सांगितलं जातं. त्यामागचा नेमका अर्थ काय? हे आज जाणून घेऊयात 

3/7

 Nagpanchami 2024 Why not use tawa and kadai on nagpanchmi and reason behind eating only boiled food

नागपंचमी हा सण ऐन पावसाळ्यात येतो. यावेळी धो धो पाऊस बरसत असतो.पावसाळ्यात नाग किंवा सापाच्या बिळात पाणी जातं त्यामुळं ते शेतात अडोसा शोधतात.त्यांची विश्रांतीस्थाने असतात. 

4/7

 Nagpanchami 2024 Why not use tawa and kadai on nagpanchmi and reason behind eating only boiled food

साप व नागांची विश्रांतीस्थाने आपल्याकडून नष्ट होऊ नये किंवा त्यांना इजा होऊ नये यासाठी खणू नये किंवा कोयता चालवू नये असं म्हटलं जातं. शेतीची कामेदेखील या दिवशी टाळली जातात. 

5/7

 Nagpanchami 2024 Why not use tawa and kadai on nagpanchmi and reason behind eating only boiled food

नागपंचमीला तव्यावर भाजू नये, कढाईत तळू नये, टोकदार वस्तु वापरु नये असं म्हणतात. मग अशावेळी उकडलेले पदार्थ करुन खाल्ले जातात. त्याप्रथेमागेदेखील एक कारण आहे. 

6/7

 Nagpanchami 2024 Why not use tawa and kadai on nagpanchmi and reason behind eating only boiled food

पावसाळ्यात हा सण आल्याने या काळात पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळं शक्यतो हलका आहार घेतला जातो. भाजलेले व तळलेल्या पदार्थांमुळं पचनशक्ती खराब होऊ शकते. 

7/7

 Nagpanchami 2024 Why not use tawa and kadai on nagpanchmi and reason behind eating only boiled food

म्हणूनच नागपंचमीच्या दिवशी उकडलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. उकडलेले अन्न खाल्ल्याने पचनशक्तीदेखील सुधारते. ( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )