विले-पार्ले नाव कसं पडलं? मुंबईतल्या या भागाने देशाला दिलाय सर्वात मोठा ब्रँड

Vile Parle Story :  देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात दररोज हजारो कोटी रुपयांची उलाढाल होते. अनेक उपनगरं मिळून कॉस्मोपॉलिटन मुंबई शहर तयार झालं आहे. इथल्या प्रत्येक उपनगराला ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे. मुंबईतलं विलेपार्ले हे असंच एक उपनगर. विलेपार्ले या शब्दावरुन हे नाव एखाद्या इंग्रज अधिकाऱ्यांने ठेवलं असेल असं वाटतं. पण या नावा मागची कहाणी मोठी रंजक आहे. 

| Jul 08, 2024, 20:00 PM IST
1/7

विलेपार्ले हे मुंबईतलं प्रसिद्ध ठिकाण आहे. या नावावरुन लोकांना हे नाव एखाद्या इंग्रज अधिकाऱ्याने ठेवलं असावं असं वाटतं. विलेपार्ले नावाबद्दल अनेक तर्कवितर्क लावले जातात. शेकडो वर्षांपूर्वी या भागात अनेक छोट्या-छोट्या वस्त्या आणि झोपड्या होत्या. विलेचा अर्थ गाव असा होतो, तर पार्ले म्हणजे पोर्तुगीज शब्द पावडे वरुन वरुन पडलं. याचा अर्थ वस्ती असा होता. 

2/7

17 हजार कोटी महसूल असलेल्या बिस्किट कंपनीने विलेपार्ले नावावरुन आपल्या बिस्किटचं नाव ठेवलं. 1929 मध्ये मोहनलाल दयाळ नावाच्या व्यावसायिकाने एका जुन्या आणि बंद असलेल्या कारखान्यात 'पार्ले-जी'ची सुरूवात झाली. आज ही कंपनी देशातील नंबर वन बिस्किट ब्रँड आहे.

3/7

मोहनलाल दयाळ यांनी विले पार्ले स्टेशनजवळ एक लहान दुकान सुरु केलं. या दुकातून त्यांनी बिस्किट विक्री सुरुवात केली. बिस्किट ब्रांड मोठं होण्यात विलेपार्लेचा हात असल्याने दयाळ यांनी आपल्या बिस्किटला नाव पार्ले-जी ( Parle G) असं दिलं. अशा प्रकारे विलेपार्ले आणि पारले-जीचं नातं बनलं.

4/7

स्वातंत्रानंतर पार्ले बिस्किटच्या व्यवसायात मंदी आली. विभाजनामुळे गहूचं उत्पादन घटलं. त्यामुळे पार्ले कंपनीला आपली ग्लुको बिस्किटाचं उत्पादन थांबवावं लागलं. यातून सावरत पार्ले-जीने आपल्या ब्रांडिंगवर लक्ष केंद्रीत केलं. एता लहान मुलीचा फोटो बिस्किटच्या पुड्यावर छापण्यात आला. या मुलीला पार्ले गर्ल नावाने ओळख मिळाली

5/7

याबरोबरच  'जी माने जीनियस', 'हिंदुस्तान की ताकत', 'रोको मत, टोको मत'...सारख्या टॅगलाईनसह पार्ले-जीने संपूर्ण देशात आपली नवी ओळख निर्माण केली. पार्ले-जीने आपल्या उत्पादनात प्रॉफिट मार्जिन कमी ठेवलं. त्यामुळे बिस्किटाचा खप प्रचंड वाढला. 

6/7

विलेपार्ले हे मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावरचं प्रसिद्ध रेल्वे स्थानकांपैकी एक आहे. पूर्वी, कोळी समाज अर्थात मच्छीमार या भागात राहत होत. पण, आता हे ठिकाण मुंबईतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या ठिकाणांपैकी एक झालं आहे. 

7/7

विलेपार्ले स्टेशनजवळ अनेक कॅफे आणि फूड स्टॉल्स आहेत. मुंबईतील सर्व विद्यार्थ्यांचं हे आवडतं ठिकाण आहे. येथील अग्रवाल मार्केट घरगुती वस्तू आणि फॅशनेबल वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे.