वॉटर बस, वॉटर टॅक्सी, बबल स्कूटर अन्... मुंबईकरांचा तुंबलेल्या रस्त्यांवरुनही 'बेस्ट' प्रवास?

Mumbai Rains Vehicles Photos: दर वर्षी पावसाचं पाणी साचून रस्ते वाहतूक ठप्प होणाऱ्या मुंबईमध्ये पर्यायी व्यवस्था काय वापरता येईल यासंदर्भातील भन्नाट पर्याय सध्या चर्चेचा विषय ठरत आहेत. ही वाहनं नेमकी काय आहेत? हा पर्याय कोणी दिलाय आणि काय चर्चा आहे पाहूयात...

| Oct 09, 2023, 13:39 PM IST
1/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

मुंबईत पाऊस पडला आणि पाणी तुंबून वाहनं अडकली नाहीत असं फारच क्वचित पाहायला मिळतं.

2/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

यंदाच्या पावसाळ्यामध्येही 2 ते 3 वेळा मुंबईकरांवर हे आस्मानी संकट आलं होतं. मात्र थोड्यात मुंबईकर यामधून निसटले.

3/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

मात्र मुंबईची दर पावसळ्यात एकदा तरी तुंबई होती आणि त्यात वाहनं अडकतात. पण यावर एका व्यक्तीने भन्नाट सोल्यूशन शोधून काढलं आहे. पावसाळ्यात मुंबईमध्ये रस्ते वाहतुकीसाठी कोणते पर्याय वापरता येतील यासंदर्भातील भन्नाट फोटो सध्या चर्चेत आहेत.

4/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

मुंबईमध्ये पडणाऱ्या पावसात अडकणाऱ्या बेस्ट बस आणि इतर गोष्टींचा विचार करुन मनोज ओमरे नावाच्या मुंबईकर तरुणाने आर्टिफिशीएल इंटेलिजन्सच्या माध्यमातून पर्याय दिले आहेत.

5/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

मनोजने त्याच्या @manojomre या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन बबल स्कूटर किंवा वॉटर टॅक्सी वगैरेसारखे पर्याय मुंबईत पावसाच्या साचलेल्या पाण्यात सुरक्षित प्रवासासाठी वापरता येईल असं म्हटलं आहे.

6/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

बेस्ट बसलाही पर्यायी व्यवस्था देता येईल असंही या फोटोंमध्ये दाखवण्यात आलं आहे.

7/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

पावसाच्या साचलेल्या पाण्यात मुंबईतील वॉटर टॅक्सी कशी असेल हे दाखवणारा हा वरील फोटो. हे पर्याय अनेकांना प्रचंड आवडले आहेत.

8/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

पॉडसारखी एकाच वेळेस अनेकांना नेणारी वॉटर व्हेइकल्सही वापरता येतील असंही या फोटोंमध्ये दिसतंय.

9/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

अशा बबल असलेल्या दुचाकीही मुंबईत पाणी साचलेल्या रस्त्यावर वापरता येईल असा एआयचा सल्ला आहे. काहींनी लवकरच या गोष्टी मुंबईत वापरायला मिळतील का असा प्रश्न विचारला आहे.

10/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

पाणी साचलेल्या रस्त्यांवरुन जाणारी ही वॉटर टॅक्सीही कल्पनेतून साकारली आहे. मीड जर्नी या एआय माध्यमातून हे फोटो तयार करण्यात आलेत.

11/11

Mumbai Rains Vehicles That Should Have Been Built For City By Now AI Art By Mumbaikar

अशाप्रकारे बबल स्कुटीही मुंबईत वापरता येईल अशीही कल्पना मांडण्यात आली आहे. मात्र यावर फार खर्च होईल त्याऐवजी नाले तुंबणार नाही याची प्रथम काळजी घ्यावी असा सल्लाही या पोस्टवरील कमेंटमध्ये मुंबईकरांनी दिला आहे. (सर्व AI फोटो - @manojomre इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन साभार)